Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

VinodKambaliNewsUpdate : GoodNews : शाब्बास संदीप !! विनोद कांबळी यांना सह्याद्री उद्योग समूहाची ऑफर …

Spread the love

अहमदनगर : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने आपली व्यथा मांडत कुटुंब चालविण्यासाठी नोकरीची गरज असल्याचे  वृत्त प्रसिद्ध झाले होते. भारताच्या क्रिकेट विश्वात आपली मोहोर उमटविलेल्या एका दमदार क्रिकेट वीराची व्यथा वाचून नगरमधील तरुण उद्योजक संदीप थोरात यांनी कांबळी यांना आपल्या सह्याद्री उद्योग समूहात थेट एक लाख रुपये महिन्याच्या नोकरीची ऑफर दिली आहे.


 क्रिकेटवीर विनोद कांबळीने आपल्या आर्थिक संकटासंदर्भात मुलाखतीच्या माध्यमातून आपली व्यथा मांडल्याने ते चर्चेत आले होते. हि बातमी अनेकांनी वाचली होती आपल्याला कुणाकडून अपेक्षा आहेत हे सुद्धा कांबळी यांनी आपल्या मुलाखतीत नमूद केले होते त्यावर अनेक उद्योजक विचार करीतही असतील पण नगर मधील उद्योजक संदीप थोरात यांनी तडकाफडकी आपली ऑफर कांबळी यांना दिली आहे. याबद्दल संदीप यांचे कौतुक करावे ठेवढे कमीच आहे. विविध वृत्त वाहिन्यांशी  बोलताना थोरात यांनी हि ऑफर दिली आहे.

हे तर आपल्या सर्वांचं अपयश…

कांबळी यांची बातमी वाचताच थोरात यांनी , तारुण्यात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर दरम्यानच्या काळात अनेक चांगल्या लोकांवर अशी वेळ येणं हे आपल्या सर्वांचं अपयश असल्याचं मत व्यक्त केलं आहे. ते पुढे म्हणाले कि , “मला महाराष्ट्राचं विशेष वाटतं. महाराष्ट्रात खूप चांगल्या व्यक्ती आहेत मात्र त्यांच्या वार्धक्याच्या काळात त्यांच्यावर ही वेळ का येते मला कधीच कळलं नाही. सिंधुताई सपकाळांना देखील त्यांचं संपूर्ण आयुष्य लोकांसमोर पदर पसरुन जगावं लागलं. आज तीच वेळ विनोद कांबळींवर देखील आलेली आहे. १९९० ते २००० या कालावधीमध्ये विनोद कांबळींनी अतिशय चांगली कामगिरी करुन भारताचं नाव एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं. मात्र आज त्या व्यक्तीला कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी ओढाताण करावी लागत असेल तर मला वाटतं की हे आपलं अपयश आहे,” असं थोरात यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना थोरात यांनी, “यासंदर्भातील सर्व बातम्या मी सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवरुन पाहिल्या. मला असं वाटलं की या माणासाला आपण खरोखर मदत केली पाहिजे,” असं म्हणत विनोद कांबळीला नोकरीची ऑफर दिली आहे. ” माझ्या फायनान्स कंपनीच्या मुंबईमध्ये १० ब्रँच होत आहेत. विनोद कांबळी हे फायनान्समधील नसले तरी क्रिकेट हा असा विषय आहे की त्यात मायक्रो मॅनेजमेंट चालतं. याच मायक्रो मॅनेजमेंटचा वापर या ब्रँचच्या व्यवस्थापनासाठी करता येईल. क्रिकेटमध्ये ज्या शिस्तीने काम चालतं तीच शिस्त ते या कंपनीमध्ये लावू शकतात असं मला वाटतं. म्हणून मी त्यांना एक लाख रुपये पगाराची ऑफर मुंबईमध्ये करणार आहे,” असं थोरात म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!