Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : चर्चेतली बातमी : जस्टीस प्रतिभा सिंह यांच्या मनुस्मृती प्रेमाला प्रा. हरी नरके यांचे उत्तर आणि प्रश्न …!!

Advertisements
Advertisements
Spread the love

मनुस्मृती सारख्या वादग्रस्त पौराणिक , वैदिक धर्म ग्रंथाने महिलांना नेहमीच आदराचे आणि सन्मानाचे स्थान दिले असल्याचे विधान दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर या न्यायमूर्ती महोदयांनी मनुस्मृतीमध्ये महिलांच्या सन्मानाचा मुद्दा असल्याचा दावा केला आहे.

Advertisements

जेंव्हा कि , या ग्रंथामध्ये महिलांना गुलामाहूनही अधिक गुलामगिरीच्या साखळदंडात बंदिस्त केले होते हे आता लपून राहिले नाही. विशेष म्हणजे भारतात महिलांना जे सन्मानाचे स्थान मिळाले आहे ते संविधानामुळे मिळाले असले तरी याच संवैधानिक पदावर बसलेल्या न्यायमूर्तीं महोदयांनी उघडपणे मनुस्मृतीसारख्या वादग्रस्त ग्रंथाचे समर्थन करावे या विषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


जस्टीस प्रतिभा सिंह यांच्या या विधानानंतर ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी या न्यायमूर्ती महोदयांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपल्या फेसबुक पेजवर मनुस्मृतीमध्ये महिलांचे स्थान नक्की काय आहे ? या विषयी लिहिले आहे.

Advertisements
Advertisements

प्रा. नरके यांनी म्हटले आहे कि , न्यायमूर्ती बाई अशी भूमिका मांडत असतील तर हे फारच चिंताजनक आहे. पुढील विचार हे महिलांसाठी सन्मानजनक आहेत का? हा स्त्री गौरव आहे का ?

मनुस्मृतीमध्ये महिलांविषयी नेमकं काय म्हटलं आहे ?

” व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे.” (मनुस्मृती, अध्याय ९ वा. श्लोक १९)

” लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे.” [5/152]

” पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी.” [5/154]

“स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्याचा भोग घेतात.” [9/14]

” पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [9/15]

” नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची त्या बायकोवरची मालकी कायम राहते.”[9/46]

” सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत.” [2/13]

” माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये.” [2/15]

” ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत.” [3/8]

” जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये.” [ 3/11]

” ज्या कुळामध्ये पिता, पती द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात.” [3/56]
” नवर्‍याने बायकोसोबत एका ताटात जेवन करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये.” [4/43]

” आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऎका- बाल्यावस्थेत मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये.” [5/47]

” स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये.” [5/48]

” पिता, पती,पुत्र यांच्यावेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते.” [5/49]

” पति जरी रागावलेला असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत.” [5/150]

” लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे.” [5/152]

” पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी.” [5/154]

” पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय.” [5/155]

” स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये.” [5/162]

” पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे.” [5/168]

” स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपल्या पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो.” [5/166]

“पिता,पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे.” [6/2]

” विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही. योग्य नाही.” [ 6/3]

” स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसर्‍याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचार दोष होत.” [9/13]

” स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतात.” [9/18]

– प्रा. हरी नरके

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!