Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EknathShindeNewsUpdate : जगातील ३३ देशांनी नोंद घेतली , आम्ही विचारांसाठी सत्तेतून बाहेर पडलो : मुख्यमंत्री

Advertisements
Advertisements
Spread the love

पंढरपूर : अनेकजण सत्तेसाठी सगळं काही सोडतात. मात्र आम्ही विचारांसाठी सत्ता सोडली. बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्त्वाच्या विचारासाठी आम्ही सत्तेतून बाहेर पडलो. एकाचवेळी ५० आमदार सत्तेतून बाहेर पडतात ही साधीसुधा घटना नाही. ही ऐतिहासिक घटना आहे. या घटनेची नोंद संपूर्ण देशाने तर घेतलीच पण जगातील ३३ देशांनीही  याची नोंद घेतल्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते पंढरपूरमधील सभेत बोलत होते.

….तर मी टोकाचे पाऊल उचलेन

दरम्यान , माझ्यासोबत ८ ते ९ मंत्र्यानी सत्ता सोडली. शिवसेनेचे ४० आमदार सरकारमधून बाहेर पडले. १० अपक्षांनी साथ दिली. इतके आमदार, मंत्री एका माणसावर विश्वास टाकतात ही साधी गोष्ट नाही. त्याचा विचार होण्याची गरज आहे. माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. आमदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या आमदारांवर मी कोणत्याही प्रकारची आच येऊ देणार नाही. त्यांचे  नुकसान होऊ देणार नाही. माझ्यासोबत राहून त्यांचे  नुकसान होत आहे  असा विचार जेव्हा माझ्या मनात येईल, तशी वेळ आलीच तर मी टोकाचे  पाऊल उचलेन. पण त्यांना तोशीस लागू देणार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

Advertisements

आपल्या बंडखोरीबद्दल बोलताना ते म्हणाले कि , आम्ही काळजावर दगड ठेवून सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आमच्यावर तेव्हा प्रचंड टीका झाली. आजही होत आहे. पण आम्ही त्यांना कामातून प्रत्युत्तर देऊ. मी कमी बोलतो आणि जास्त काम करतो. सभागृहातले  माझे  भाषण अनेकांनी ऐकले  असेल. त्यातही मी फार कमी बोललो आहे. वेळ पडलीच तर सगळे  बोलेन, सगळ्याच गोष्टी सांगेन, असेही  शिंदे म्हणाले.

Advertisements
Advertisements

…पण आम्ही गप्प होतो

गेल्या अडीच वर्षात घडलेल्या गोष्टींवर भाष्य करताना शिंदे म्हणाले कि , स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान होऊनही आम्हाला सत्तेत असल्याने  गप्प राहावे  लागत होते . दाऊदशी संबंध असलेल्या मंत्र्यांसोबत काम करावे  लागत होते . शिवसैनिकांचे  खच्चीकरण सुरू होते . अनेकांना तडीपार करण्यात आलं. काहींवर तर मोक्का लागला आणि हे सगळे आपलेच सरकार असताना घडत होते. त्यामुळेच सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आमची लढाई सोपी नव्हती. मात्र आमदारांनी विश्वास दाखवला. त्यांच्यामुळेच हे शक्य झाल्याचे शिंदे म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!