Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : धक्कादायक : जीएसटी आता तुमच्या ताटापर्यंत , इतर उत्पदनावरही ३ ते ६ टक्क्यांची मोठी वाढ …

Spread the love

मुंबई: येणाऱ्या १८ जुलै पासून अन्नधान्य आणि डेअरी उत्पादनावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलने घेतला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जीएसटी कौन्सिलच्या २८ आणि २९ जून रोजी चंदीगढमध्ये झालेल्या बैठकीत काही महत्वाच्या वस्तूंवरील करात वाढ करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्याचबरोबर अन्नधान्य, लस्सी, दही यारख्या रोजच्या जेवणातील पदार्थांवर पाच टक्के जीएसटी लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती. 

विशेष म्हणजे आतापर्यंत फक्त ब्रॅन्डेड आणि पॅकड् धान्य आणि पदार्थांवर जीएसटी लावण्यात येत होता. परंतु आता रीटेल स्वरूपात पॅकिंग करून विकण्यात येणाऱ्या पदार्थांवर पाच टक्के जीएसटी लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान नागरिक  आधीच महागाईने त्रस्त असून या जीएसटीचा परिणाम ग्राहकांवर होणार असल्याचे  व्यापारी संघटनांनी म्हटले आहे. फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स महाराष्ट्रा आणि द पूना मर्चंट चेंबर्स या व्यापाऱ्यांच्या संघटनांनी केद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करायचे ठरवले  आहे.

असे आहेत जीएसटी करातील नवे बदल

  • प्रिंटरमध्ये वापरण्यात येणारी शाई – आधी १५ टक्के, यापुढे १८ टक्के
  • चाकू, चमचे, फोर्क, पेन्सिल, शार्पनर वगैरे – आधी १२ टक्के, यापुढे १८ टक्के
  • विजेवर चालणारे पंप, सबमर्सिबल पंप, बायसिकल पंप – आधी १५ टक्के, यापुढे १८ टक्के
  • डेअरीमध्ये वापरण्यात येणाऱ्या मशीन, धान्याच्या मिलमध्ये वापरण्यात येणाऱ्या मशीन, स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या मशीन – आधी १२, यापुढे १८ टक्के
  • पवन चक्कीला लागणारे पार्टस, शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या मशिन्स, फळांवर प्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या मशीन – आधी १२, यापुढे १८ टक्के
  • एलईडी लॅंप आणि त्यासाठी लागणारे पार्टस – आधी १२, यापुढे १८ टक्के
  • ड्रॉईंग आणि मार्किंगसाठी लागणारे साहित्य – आधी १२, यापुढे १८ टक्के
  • सोलर वोटर हीटर – आधी ५टक्के, यापुढे १२ टक्के
  • लेदरच्या वस्तू – आधी ५ टक्के, यापुढे १२ टक्के
  • चामड्याच्या वस्तू आणि फुटवेअर आणि त्याच्याशी संबंधित वस्तू – आधी ५ टक्के, यापुढे १२ टक्के
  • मातीची भांडी – आधी ५ टक्के, यापुढे १२ टक्के
  • रस्ते, पूल, रेल्वे , मेट्रो क्रिमेटोरियम वगैरेची कामे – आधी १२ टक्के, यापुढे १८ टक्के
  • चेक्स, सुटे चेक्स किंवा चेकबुक – आधी कोणताही जीएसटी कर लागू नव्हता, यापुढे १८ टक्के
  • वेगवगेळ्या प्रकारचे नकाशे – आधी कोणताही जीएसटी कर लागू नव्हता, यापुढे १८ टक्के
  • ई वेस्ट – आधी ५ टक्के, यापुढे १८ टक्के

आपलं सरकार

Click to listen highlighted text!