Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कोरोना काळात मोठी कमाई, कर चुकवेगिरीच्या आरोपावरून ‘डोलो’ च्या संचालकांवर छापे

Spread the love

नवी दिल्ली : डोलो 650 टॅब्लेट बनवणाऱ्या मायक्रो लॅब्स कंपनीवर बुधवारी आयकराने छापा टाकला. एका वृत्तानुसार आयकर विभागाने कंपनीच्या दिल्ली, बंगळुरूसह एकूण 40 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. मायक्रो लॅब्स कंपनीवर करचुकवेगिरीचा आरोप आहे. देशात लॉकडाऊन असताना या कंपनीने गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक डोलो 650 टॅब्लेटची विक्री केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोविड दरम्यान कंपनीने देशभरात डोलो 650 च्या एकूण 350 कोटी टॅब्लेटची विक्री केली होती, ज्यामुळे कंपनीला 400 कोटी रुपयांचा नफा झाला. कंपनीवर करचुकवेगिरीच्या आरोपांदरम्यान आयकर विभागाने सीएमडी दिलीप सुराणा आणि संचालक आनंद सुराणा यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!