IndiaNewsLatestUpdate : मोठी बातमी : कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपींना वकिलांनीच कोर्टाबाहेर ठोकले !!

जयपूर : उदयपूर कन्हैयालाल हत्याकांडातील मारेकऱ्यांना कडेकोट बंदोबस्तात शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींना जयपूरच्या एनआयए विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.
आरोपी रियाझ, गौस मोहम्मद, मोहसीन आणि आसिफ यांना कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले. त्यांना एटीएस मुख्यालयातून विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी वकिलांनी न्यायालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली. वकिलांच्या आंदोलनादरम्यान फाशीची मागणीही करण्यात आली. वृत्तानुसार, जमावाने जयपूर कोर्टाबाहेर दोन्ही आरोपींवर हल्ला केला.