AmravatiMurderNewsUpdate : पोलिसांचा मोठा खुलासा , नुपूर शर्मा ची पोस्ट व्हायरल केल्यामुळेच उमेश कोल्हे यांची हत्या
अमरावती : अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या त्यांनी नुपूर शर्माची पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाल्याचा खुलासा अमरावती पोलिसांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे . पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी हा खुलासा केला आहे. डॉ . अनिल बंडे यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने अमरावतीतील या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेत या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे.
#WATCH Umesh Kolhe murder case | A total of six accused have been arrested so far from Amravati. During the investigation, we found that Umesh Kolhe had posted on social media in support of Nupur Sharma and this incident took place because of that post: Vikram Sali, DCP Amravati pic.twitter.com/0XRnfWjWXS
— ANI (@ANI) July 2, 2022
याबाबत पोलीस उपायुक्त विक्रम साळी म्हणाले कि , उमेश कोल्हे खून प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला. त्यात प्रथमदर्शी उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जी पोस्ट केली त्याच संबंधाने हा गुन्हा घडल्याचं निष्पन्न झालं आहे. एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान या घटनेमागे कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा हात आहे का ? याचाही तपास करण्यात येत आहे.
भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी केली होती तक्रार
अनिल बोंडे म्हणाले, “अमरावतीत मोठं कटकारस्थान घडत आहे. त्यामुळे अमित मेडिकलच्या उमेश कोल्हे या सज्जन माणसाला जीव गमवावा लागला. नागरिकांमध्ये देखील भयाचं वातावरण आहे. ते दूर केलं पाहिजे.”
“नुपूर शर्मांच्या पोस्ट ज्यांनी लाईक केल्या, कमेंट केल्या, फॉरवर्ड केल्या त्या सर्वांना धमक्या आल्या आहेत. माफी मागा म्हणून या धमक्या आल्या आहेत. उमेश कोल्हे यांचे मी जे स्क्रिनशॉट पाहिले त्यातही असाच प्रकार आढळून आला. त्यामुळे या खूनाशी त्या गोष्टीचा संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असं मत अनिल बोंडे यांनी व्यक्त केलं होतं.