IndiaNewsUpdate : देशात जे काही होते आहे त्याला हीच एकटी महिला जबाबदार , प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या टिप्पणीवरून सर्वोच न्यायालयाने नुपूर शर्माला फटकारले …
नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फैलावर घेत फटकारले. आज देशात जे काही होत आहे त्याला केवळ हि एक महिला जबाबदार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. देशभरातील विविध न्यायालये आणि पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेले खटले दिल्लीत हलवण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भाजपच्या माजी नेत्यानाही फटकारे लावत देशात घडणाऱ्या हिंसक घटनांसाठी हेच सर्व नेते जबाबदार असून या सर्वांनी देशाची माफी मागावी असे निर्देश दिले. याचिकार्ट्यांचे वकील मनिंदर सिंग यांनाही न्यायालयाने यावेळी फटकारले.
विशेष म्हणजे यावेळी शर्मा यांच्या वकिलांनी त्यांनी माफी मागितल्याचं सांगितलं. त्यावर न्यायालयाने शर्मांनी भावना दुखावल्या असतील तर… असं म्हणत सशर्त माफी मागितल्याचं निरिक्षण नोंदवलं. तसेच त्यावर नाराजी व्यक्त करीत न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, आरोपीने टीव्हीवर जाऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, असं मत मांडलं. तसेच आरोपीने आपलं वक्तव्य मागे घेण्यास खूप उशीर केला, तरी सशर्त माफी मागितल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
न्यायालयाने काय म्हटले ?
न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, “त्यांना धमक्यांचा सामना करावा लागत आहे आणि त्या स्वतःच सुरक्षेसाठी धोकादायक बनल्या आहेत? त्यांनी ज्या प्रकारे संपूर्ण देशाच्या भावना भडकवल्या आहेत, त्यामुळेच सध्या देशात हे सर्व काही घडत असून या सर्व प्रकाराला केवळ हि एकटी महिला जबाबदार आहे.
न्यायमूर्ती म्हणाले, ” आम्ही ती सर्व डिबेट बघितली आहे. नुपूर शर्माला भडकावण्यात आले त्यामुळे तिने ज्या पद्धतीने हे सर्व वक्तव्य केले आणि स्वतः वकील असल्याचे सांगितले, ते लज्जास्पद आहे. तिने याबद्दल देशाची माफी मागितली पाहिजे.”
सत्ताधारी पक्षाचा सपोर्ट आहे म्हणून कोणतेही विधान कराल का ?
न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, “तिच्या टिपण्णीतून तिचा हट्टी आणि अहंकारी स्वभाव दिसून येतो. तिने त्याच कोर्टात जावे , जिथे जिथे तिच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. ती कोणत्याही पक्षाची प्रवक्ता असेल तर काय झाले ? तिला सत्ताधारी पक्षाचा सपोर्ट आहे म्हणून देशाच्या कायद्याची पर्वा न करता ती काय कोणतेही विधान करू शकते ? त्यावर वकील तिचा बचाव करताना म्हणाले कि , केवळ अँकर ने प्रश्न विचारल्यामुळे तिने उत्तर दिले त्यावर न्यायालयाचे म्हणाले त्या अँकरवरही गुन्हा नोंदवा.
प्रत्येक न्यायालयात जा , जेथे तक्रारी दाखल असतील …
न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, “लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत गवत वाढण्याचा अधिकार आहे आणि गाढवाला ते खाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तुमच्याकडे यावर उपाय आहे आणि तुम्ही संबंधित उच्च न्यायालयांमध्ये जाऊ शकता. ही बाब आणि कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. ” शर्मा यांचे वकील कायदा आणि पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या प्रकरणाचा हवाला देत शर्मा यांची बाजू घेत असताना न्यायमूर्तींनी ही टिप्पणी केली.
दुसऱ्यांना अटक होते , तुम्हाला अटक का नाही झाली ?
न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, “एफआयआरचे काय झाले? जेव्हा तुम्ही इतरांविरुद्ध एफआयआर दाखल करता तेव्हा त्यांना ताबडतोब अटक केली जाते, परंतु जेव्हा तुमच्या विरोधात असते तेव्हा तुम्हाला हात लावण्याचे धाडस कोणी करत नाही.” शर्मा यांचे वकिल जेंव्हा विविध पोलिस ठाण्यात नुपूर शर्माच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरबाबत माहिती देत होते तेंव्हा न्यायमूर्तींनी ही टिप्पणी केली.