Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Political Crisis : शिवसेनेतून घाण गेली , आता जे होईल ते चांगलेच होईल : आदित्य ठाकरे

Spread the love

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय गदारोळावर शिवसेनेकडून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खा. संजय राऊत आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी बागी मंत्री आणि आमदारांवर हल्ला बोल केला आहे. या विषयावर  त्यांनी शिवसैनिकांशी मुक्त संवाद साधला.

”महाराष्ट्रात जे सुरू आहे, ते पाहून मला धक्का बसला आहे. ज्यांना विरोधात जायचे आहे, त्यांनी राजीनामे देऊन जावे. हिंमत असेल तर सर्व बंडखोर आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हानदेताना ते म्हणाले कि , आता जे होईल ते चांगलेच होईल. शिवसेनेतून घाण गेली आहे. काळाच्या ओघात माणसं कशी बदलतात हे आपण पाहिलं आहे. सध्या सर्वांच्या नजरा मुंबई महापालिकेकडे लागल्या आहेत. पण आजपर्यंत जे काही केले ते महाराष्ट्रासाठी केले.”

आदित्य पुढे म्हणाले कि , आपण त्यांना काय कमी पडू दिलं किंवा देण्यात चुकलो हे समजत नाही” ”भाजपची नजर मुंबई महापालिकेवर आहे. पण  एअरपोर्ट ते विधानसभेचा रस्ता वरळीतून जातो हे विसरू नका. बहुमत सिद्ध करण्यासाठी सर्वांना येथून जावे लागेल.”

दरम्यान बंडखोर आमदारांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, ”संजय पवार यांना आपण  राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी दिली, त्यापूर्वी ते सामान्य शिवसैनिक होते. महाराष्ट्राला सध्या असा मुख्यमंत्री लाभला आहे, ज्यांचा  कशातही स्वार्थ नाही, सत्तेचा मोह नाही. असा मुख्यमंत्री कुठे मिळेल?” “‘आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे शब्द देतात ते पूर्ण करतात. ते आपल्या लोकांची काळजी घेतात. आम्ही प्रत्येक शिवसैनिकाला दिलेले वचन पूर्ण करतो.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!