Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EknathShindeNewsUpdate Live : एकनाथ शिंदे यांची गट नेते पदावरून हकालपट्टी , उद्धव ठाकरे यांनी कापले पार्टीचे दोर …!!

Spread the love

मुंबई : शिवसेनेचे गट नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे बंडाच्या तयारीत असल्याचे दिसताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील संतप्त झाले असून शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करण्याचा कठोर निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे. शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याचा अर्थ शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातील बोलणी फिस्टकली असून  उद्धव ठाकरे यांनी त्यांचे परतीचे दोर कापून टाकले आहेत. दरम्यान ठाकरे हे आता शिवसेना भवनात जाऊन शिवसैनिकांशी बोलणार आहेत. तेथे ठाकरे काय भूमिका काय घेणार, यावर एकनाथ शिंदे आपले धोरण ठरविणार असल्याचे सांगण्यात आले.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपण सत्तेसाठी प्रतारणा करणार नसल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटवरून शिवसेनेचे नाव हटविल्याचे सांगितले आहे.

शरद पवार यांची पत्रकार परिषद

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ठाकरे सरकार बनविताना देखील अशी बंडाळी झाली होती. पण नंतर काय झालं, हे संपर्ण देशाने पाहिलं. आताही चर्चेतून सगळं काही ठीक होईल, असा विश्वास आहे. पण सध्या शिवसेनेत जे काही चाललंय तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू असं शरद पवार म्हणाले. त्यावर सरकार कोसळेल का? आणि सरकार पडल्यावर राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, आपण भाजपसोबत जाणार का?, असा थेट सवाल पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. त्यावर ‘जरा तरी सेन्सिबल प्रश्न विचारा. आम्ही विरोधी पक्षात बसू’, असं थेट उत्तर पवारांनी दिलं.

राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही

तेवढ्यात भाजपच्या ऑपरेशन लोटससंबंधी प्रश्न विचारताना ठाकरे सरकार पडलं तर आपली भूमिका काय असेल, राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल का? असा थेट प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. पत्रकाराच्या प्रश्नावर पवार काहीसे संतापले. थोडे तरी सेन्सिबल प्रश्न विचारा, असं म्हणत आम्ही विरोधी पक्षात बसायला तयार आहोत, असं स्पष्टपणे पवारांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षावरील बैठकीला उपस्थित असणारे शिवसैनिक नेते

१. वैभव नाईक

२. दिवाकर रावते

३. उदयसिंग राजपूत

४. विनायक राऊत

५. नरेंद्र दराडे

६. अनिल देसाई

७. विकास पोतनीस

८. सुभाष देसाई

९. वरून सरदेसाई

१०. अरविंद सावंत

११. किशोर दराडे

१२. किशोर साळवी

१३. आमशा पाडवी

१४. चंद्रकांत रघुवंशी

१५. रवींद्र वायकर

१६. गुलाबराव पाटील

१७. संजय राऊत

१८. नीलम ताई गोरे

१९. दादा भुसे

२०. सचिन अहिर

२१. सुनील शिंदे

२२. संजय राठोड

२३. सचिन पडवळ

२४. अंबादास दानवे

२५. मंगेश कुडाळकर

२६. प्रकाश फातर्पेकर

२७. राहुल पाटील

२८. सुनील प्रभू

२९. दिलीप लांडे

३०. उदय सामंत

३१. राजन साळवी

३२. रमेश कोरगावकर

३३. अजय चौधरी

३४. राजू पेडणेकर

३५. दिपक केसरकर

३६. ज्योती ठाकरे

शिवसेनेच्या  संपर्काबाहेर असलेले आमदार

एकनाथ शिंदे – कौपरी

अब्दुल सत्तार – सिल्लोड – औरंगाबाद

शंभूराज देसाई – सातारा

संदीपान भुमरे – पैठण – औरंगाबाद

उदयाससह राजपूत – कन्नड – औरंगाबाद

भरत गोगावले – महाड – रायगड

नितीन देशमुख – बाळापूर – अकोला

अनिल बाबर – खानापूर – आटपाडी – सांगली

विश्वनाथ भोईर – कल्याण पश्चिम

संजय गायकवाड – बुलढाणा

संजय रामुलकर – मेहकर

महेश सिंदे – कोरेगाव – सातारा

शहाजी पाटील – सांगोला – सोलापूर

प्रकाश आबिटकर – राधापुरी – कोल्हापूर

संजय राठोड – दिग्रस – यवतमाळ

ज्ञानराज चौघुले – उमरगास – उस्मानाबाद

तानाजी सावंत – पारोडा – उस्मानाबाद

संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम

रमेश बोरनारे – बैजापूर – औरंगाबाद

आपलं सरकार

Click to listen highlighted text!