Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : शहरात शेकडो मोटरसायकलस्वार वापरतात हेल्मेट

Spread the love

औरंगाबाद – पोलिसआयुक्तालयाने आज शंभराव्या मोटरसायकल स्वाराचा सौरउर्जेवर चालणारा कंदील आणि प्रशस्तीपत्र देत सत्कार केला.अशी माहिती पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली.


गेल्या दहा आठवड्यांपासून हा स्तुत्य उपक्रम शहर पोलिस आणि क्रेडाईच्या विद्यमाने पार पाडला जात आहे. पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग यशस्वी झाल्याची माहिती शहर वाहतूक पोलिस निरीक्षक मनोज बहुरे यांनी दिली.

शहर वाहतूक क्षेत्रात पाच विभाग आहेत. शहर चे दोन छावणी, वाळूज, आणि सिडको या पाच विभागात कर्तव्य बजावत असलेले ठराविक कर्मचारी हेल्मेट वापरणार्‍या वाहनधारकांचे फोटो काढतात. आपल्याच पाहुण्या रावळ्यांचे फोटो कर्मचार्‍यांनी काढून यादी तयारकेली जाणार नाही याची खबरदारी वाहतूक विभागाकडून घेतली जाते.ते पाच विभागातून अंदाजे साडेतीनशे फोटो होतात.

या मधे सर्व फोटो काढलेले वाहनधारकांवर कोणती दंडात्मककारवाई, कोणता गुन्हा दाखल नसल्याची खातरजमा केली जाते. गुन्हे किंवा कारवाईला सामोरे गेलेल्या वाहनधारकांना सत्काराच्या प्रक्रियेतून वगळण्यात येते. व प्रत्येक विभागातून दोन असे दहा मोटरसायकलस्वार लकी ड्राॅ पध्दतीने निवडले जातात. त्यावर सहाय्यक पोलिसआयुक्तांचा शिक्का मोर्तब झाल्यावर पोलिसउपायुक्त अपर्णा गिते प्रशस्तीपत्रासाठी शिक्कामोर्तब झालेली नावे पोलिसआयुक्तांकडे पाठवतात.व त्यानंतर हेल्मेट वापरणार्‍या नागरिकांचा सन्मान केला जातो.शहरातून या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळंत सल्याचा दावा पोलिस निरीक्षक बहुरे यांनी केला आहे

 

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!