Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UpNewsUpdate : प्रयागराज बुलडोझर कारवाई विरोधात वकिलांची हायकोर्टात धाव …

Spread the love

नवी दिल्ली : प्रयागराजमध्ये हिंसाचाराचा आरोप असलेल्या जावेद अहमद यांच्या घरावर बुलडोझर टाकून पाडण्याच्या कारवाईचे प्रकरण तापले आहे. याबाबत वकिलांच्या एका गटाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिले असून, आरोपी जावेद हा पाडलेल्या घराचा मालक नसल्याचे वकिलांच्या वतीने सांगण्यात आले आहे. घर जावेदच्या पत्नीच्या नावावर आहे. घर पाडणे कायद्याच्या विरोधात आहे. बेकायदा बांधकामाबाबत आरोपीच्या पत्नीला कोणतीही पूर्व माहिती देण्यात आली नव्हती.


वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सरचिटणीस जावेद अहमद यांना शुक्रवारी हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली होती. दुसरीकडे, प्रयागराज विकास प्राधिकरणाने रविवारी त्यांचे आलिशान घर पाडले. बेकायदा बांधकाम केल्याच्या आरोपावरून प्रशासनाने ही कारवाई केली.

प्रशासनाचे म्हणणे असे कि , नोटीस दिली होती…

दरम्यान प्रयागराज विकास प्राधिकरणाने म्हटले आहे कि , कारवाईपूर्वी जावेदच्या घराबाहेर पीडीएसच्या वतीने नोटीस चिकटवण्यात आली होती.  या नोटीसमध्ये विकास प्राधिकरणाची आवश्यक परवानगी न घेता तळमजला आणि पहिल्या मजल्यावर बेकायदेशीरपणे बांधकाम केल्याचे म्हटले आहे. यासाठी तुम्हाला १९७३ च्या कलम २७(१) अन्वये कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून सुनावणीची तारीख २४ मे ठेवण्यात आली आहे. मात्र या दरम्यान तुम्ही स्वतः किंवा तुमच्या बाजूचे कोणीही सुनावणीच्या तारखेला आले नाही. त्यामुळे 25 मे रोजी बांधकाम पाडण्याचे आदेश काढण्यात आले.

पीडीएसच्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “या संदर्भात, तुम्हाला नोटीस जारी करण्यात आली होती आणि ती 9 जूनपर्यंत खाली करण्याची सूचना तुम्हाला देण्यात आली होती. परंतु तुम्ही ते काम केले नाही. त्यामुळे 12 जून रोजी सकाळी 11:00 वा. जोपर्यंत ती जागा रिकामी केली जात नाही तोपर्यंत ते पाडण्याची कारवाई करता येईल.

या संपूर्ण प्रकरणावर प्रयागराजचे डीएम संजय खत्री यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासन आणि पीडीएने जावेद मोहम्मदच्या घरावर कारवाई केली आहे. त्यामुळे आज कारवाई करताना पीडीएकडून जमीनदोस्त करण्याचे काम करण्यात आले आहे. ज्यांची घरे पीडीएच्या निकषानुसार नाहीत अशा सर्वांवर कारवाई केली जाईल.

घर झडतीत आढळली बेकायदा शस्त्रे आणि पोस्टर्स

प्रयागराज हिंसाचारातील मुख्य आरोपी जावेद मोहम्मद याच्या घरातून बेकायदेशीर शस्त्रे आणि आक्षेपार्ह पोस्टर्स जप्त करण्यात आल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. एसपी कॅप्टन अजय कुमार यांनी रविवारी दावा केला की, त्यांचे घर पाडण्यापूर्वी घराची झडती घेण्यात आली होती, ज्यामध्ये 12 बोअर आणि 315 बोअरची पिस्तुले  जप्त करण्यात आली होती. यासोबतच काही पोस्टर्स आणि बॅनरही जप्त करण्यात आले असून, या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.

दरम्यान राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, शुक्रवारच्या निदर्शनांदरम्यान मालमत्तेची नासधूस झाल्यास, राज्य 2020 च्या कायद्यानुसार गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करेल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी लखनौ, प्रयागराज आणि मेरठ येथे तीन न्यायाधिकरण उघडण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!