Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WBNewsUpdate : प्रेषित मोहम्मद पैगंबर विवाद , पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार चालूच….

Spread the love

कोलकाता : भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरून पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी झालेल्या निदर्शनेनंतर आंदोलकांनी रविवारी पुन्हा एकदा आंदोलकांनी नादिया जिल्ह्यात लोकल ट्रेनवर हल्ला केला. पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील बेथुआदहरी रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी ही घटना घडवून आणल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


याविषयी अधिक माहिती देताना , पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मोठ्या संख्येने आंदोलक रास्ता रोको करून निषेध करत होते आणि पोलिसांनी त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यापैकी काही स्टेशनमध्ये घुसले. जमावाने फलाटावर धावणाऱ्या ट्रेनवर दगडफेक सुरू केली. हल्ल्यामुळे लालगोला मार्गावरील रेल्वे सेवा प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एकलव्य चक्रवर्ती म्हणाले, “सुमारे एक हजार लोकांच्या अनियंत्रित जमावाने ट्रेनवर दगडफेक केली. यामध्ये काही प्रवासी जखमी झाले आहेत. सध्या तेथे रेल्वेची वाहतूक नाही. आम्ही राज्य सरकारच्या मंजुरीची वाट पाहत आहोत.

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर शुक्रवारी देशभरात निषेध व्यक्त करण्यात आला. हावडा येथे जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर प्रशासनाने काही काळ इंटरनेट बंद केले होते. विशेष म्हणजे बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांना पूरबा मेदिनीपूर जिल्ह्यातील तमलूक येथे रोखले जेणेकरून तो हिंसाचारग्रस्त भागाकडे जाऊ नये. नंतर, दोन तास थांबल्यानंतर, हावडा जिल्ह्यालगतच्या हिंसाचारग्रस्त भागात न जाता थेट कोलकात्याला जाण्याच्या अटीवर त्यांना  पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली.

दरम्यान भाजपच्या पश्चिम बंगाल युनिटचे सह-प्रभारी अमित मालवीय यांनी ट्विट केले आहे की,  भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांना ताब्यात घेऊन , ममता बॅनर्जी आता हे सुनिश्चित करत आहेत की विरोधी शुभेंदू अधिकारी हावडा येथे जाऊ शकत नाहीत, जिथे भाजपची कार्यालये जाळली गेली आहेत. त्यांचे संपूर्ण लक्ष धर्मांधांवर नसून विरोधकांवर आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!