Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : राहुल गांधी यांची आज ‘ईडी’ समोर पेशी , काँग्रेसची देशभर निदर्शने

Spread the love

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या म्हणजेच १३ जून रोजी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) चौकशीसाठी हजर होणार आहेत. दरम्यान या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने तपास एजन्सीच्या देशभरातील  २५ कार्यालयाबाहेर निदर्शने करणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.


यावा बोलताना काँग्रेस नेते मणिकम टागोर म्हणाले की, “विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांकडून अधिकाराचा गैरवापर केला जात आहे. त्याचा  निषेध करण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते तपास एजन्सीच्या देशभरातील २५ कार्यालयांबाहेर निदर्शने करतील. खोट्या प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी  यांना गोवण्याचा कट रचला जात आहे. आपल्या नेत्यांवरील आरोप “बनावट आणि निराधार” असल्याचे कॉंग्रेस नेत्याचे मत आहे आणि ही कारवाई “सूडाच्या राजकारणाचा” भाग आहे. “देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांवर छापे टाकून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

काँग्रेस नेते मणिकम टागोर पुढे म्हणाले की, राहुल गांधी हे प्रामाणिक नेते आहेत, सरकार ज्या प्रकारे एजन्सीचा गैरवापर करत आहे, त्याचा निषेध करण्यासाठी ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. ईडी आणि सीबीआय भाजपच्या प्रमुखाप्रमाणे काम करत आहेत. हे लोक नोटीस काढून या सगळ्या गोष्टी करत राहणाऱ्या अधिकाऱ्याला आमदारकीचे तिकीट देतात. पण तरीही आंदोलन करणे हा आपला लोकशाही अधिकार आहे.

काँग्रेसच्या मते असे आहे प्रकरण ?

या प्रकरणाबद्दल बोलताना काँग्रेस नेत्यांनी सांगितले कि , नॅशनल हेराल्ड प्रकरणात चुकीच्या पद्धतीने पैशाच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता. नॅशनल हेराल्ड जवाहरलाल नेहरूंनी राष्ट्र विचारासाठी सुरू केले होते, ते बंद  झाले. त्यांच्या पत्रकार व कर्मचार्‍याला पगार दिला जात नव्हता, त्यांचे घर चालावे म्हणून काँग्रेसने इन्स्टॉलेशनमध्ये पैसे दिले, ते काँग्रेसचे पैसे होते आणि व्हीआरएसही देण्यात आला. त्याबद्दल  हे लोक पक्षावर आरोप करत आहेत. खरे तर ही एक ना-नफा ना तोटा या तत्वावर चालणारी कंपनी आहे, तरीही  हे लोक राहुल गांधींवर आरोप करत आहेत.

सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोविडच्या त्रासामुळे सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सोनिया गांधींना अलीकडच्या काळातच कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्या हळूहळू बरी होत होत्या. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना आज सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

75 वर्षीय सोनिया गांधी 2 जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह झाल्या होत्या, त्यानंतर त्या हळूहळू बरे होत होत्या. नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोनिया गांधी यांना २३ जून रोजी चौकशीसाठी बोलावले होते. यापूर्वी 8 जून रोजी सोनिया गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. पण कोरोनाची लागण झाल्यामुळे सोनिया गांधी या तारखेला ईडी कार्यालयात पोहोचल्या नाहीत, त्यानंतर त्यांना 23 जूनला बोलावण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!