Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha2024 ElectionNewsUpdate : जाणून घ्या देशातील १० राज्यातील ९६ लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानाचा टक्का किती ?

Advertisements
Advertisements
Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १० राज्यातील ९६ लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. चौथ्या टप्प्यात एकूण ६३.०४ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी मतदान झाले.

तरीही उन्हाचा पारा बघता अनेक ठिकाणी मतदानाची वेळ सायंकाळी ६ पर्यंत वाढवण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले होते. यावेळी आसामध्ये सर्वाधिक ७५.२६ टक्के, तर महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजेच ५३.७७ टक्के मतदानाची नोंद झाली होती.

Advertisements

राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणेनंदुरबार – ६०.६० टक्केजळगाव – ५१.९८ टक्केरावेर – ५५.३६ टक्केजालना – ५८.८५ टक्केऔरंगाबाद – ५४.०२ टक्केमावळ – ४६.०३ टक्केपुणे – ४४.९० टक्केशिरूर – ४३.८९ टक्केअहमदनगर- ५३.२७ टक्केशिर्डी – ५२.२७ टक्केबीड – ५८.२१ टक्के

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, चौथ्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७६.०२ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी म्हणजेच ३६.८८ टक्के मतदानाची नोंद झाली. याबरोबरच आंध्र प्रदेशमध्ये ६८.२० टक्के, बिहारमध्ये ५५.९२ टक्के, महाराष्ट्रात ५२.९३ टक्के झारखंडमध्ये ६४.३० टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये ६९.१६ टक्के मतदान झाले. याशिवाय ओडिशात ६४.२३ टक्के, तेलंगणात ६१. ५९ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ५८.०२ टक्के मतदान झाल्याचं बघायला मिळालं.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!