Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : शहरातील खून , पोलीस आणि समाज व्यवस्था यांचे कनेक्शन काय ?

Spread the love

जगदीश कस्तुरे / औरंगाबाद : शहरात लागोपाठ सतत खून होत आहेत म्हणून शहरातील पुढारी, समाजसेवी संघटना, महिला संघटना पोलिसआयुक्तालयात जाऊन पोलिसआयुक्तांना समाज प्रबोधन करा असा हट्ट करु लागले. रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी पुन्हा अशा स्वरूपाचे गुन्हे केले तर त्यांच्यावरील देखरेखीची जबाबदारी पोलिसांची आहे पण अलीकडच्या काळात शहरात घडलेले गुन्हे हे कौटुंबिक कलहातून झाल्यामुळे नागरिकांनीही यावर आत्मपरीक्षण करण्याची जबादारी आहे. 


दरम्यानच्या काळातील गुन्ह्यांची मालिका लक्षात घेता शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी निष्क्रिय  आहेत, गुन्हेगारांवर त्यांचा वाचक किंवा धाक राहिला नाही अशी भाषा काही नागरिक वापरु लागले आहेत.  पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्या सुसंवाद असावा असे म्हटले जात आहेत मात्र अशा पध्दतीची संवाद थेरपी अशिक्षीत नागरिकांसाठी वापराने एक वेळ समजू शकते पण असा आग्रह धरणारांमध्ये शहरातील जेष्ठ सत्ताधारी नेते, सामाजिक संघटना आणि इतर सुशिक्षित नागरिकांचा समावेश आहे. या परिस्थितीत महिला संघटना यांनीही  पोलिस प्रशासनावर बेजबाबदार असल्याचे आरोप करणे  हे चुकीचे ठरत नाही काय ?

गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी

नागरिकांच्या अशा दबावात येत पोलिसांनी एसआयटी स्थापन करुन एका खुनाचा तपास सुरु केला.व नागरिकांच्या दबावामुळेच महाविद्यालयात जाऊन तरुण तरुणींशी संवाद साधताना दिसंत आहेत. पण नागरिकांनी सूज्ञपणे जर विचार केला. तर हा समाजभान हरवल्याचा प्रकार आहे. यामधे पोलिस प्रशासनाचा दोष तो काय ? तरीही गुन्हा घडल्यानंतर पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्तांच्या निगराणीत पोलिसांनी  यातील गुन्हेगार तत्परतेने जेरबंद केले. गुन्हेशाखा पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली  गुन्हे शाखा चांगला परफार्मन्स देत आहे.पीएसआय अमोल म्हस्के, कल्याण शेळके तपासात पूर्ण झोकून देतांना दिसतात.

घडलेले गुन्हे कौटुंबिक कलहातून …

दरम्यान शहरात ज्या तीन खुनाच्या घटना घडल्या त्यातील आरोपी हे रेकाॅर्डवरचे गुन्हेगार नव्हते कौटुंबिक व सामाजिक कलहातून हे खून झालेले आहेत. त्यातील एक एक तर्फी प्रेमातील, ज्यात आरोपी शरणसिंग अटकेत आहे.आई – वडिलांचा खून करणारा देवेंद्र कलंत्रीही अटक आहे. तसेच बायकोचा खून करणारा बालाजी लोणीकर हाही पोलिस कोठडीत आहे.समाज म्हणून नागरिक कौटुंबिक संवाद जेंव्हा हरवतात तेंव्हा अशा घटना घडतात, हे उघड आहे.

खरे तर सर्वसामान्य नागरिकांनीही पोलिसांकडून योग्य त्या अपेक्षा ठेवाव्या यात गैर काही नाही.पण समाजात कलह निर्माण करण्यात पोलिस प्रशासन जबाबदार आहे काय ? याचाही विचार होणे गरजेचे आहे.जर रेकाॅर्डवरचे गुन्हेगार पोलिस प्रशासनाला आव्हान देत सामाजिक शांतता भंग करंत असतील आणि तेंव्हा पोलिस प्रशासन गंमत बघंत असेल तर मात्र पोलिस प्रशासनाला नागरिकांनी कडक जाब विचारलाच पाहिजे यात शंका नाही. समाजाला निदान औरंगाबादेत नागरिकांना आत्मपरिक्षणाची गरंज आहे असे म्हटल्यास अतिशोयक्ती ठरु नये.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!