Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime Update : सिडकोतील डॉक्टरच्या घरफोडीत 20 लाखांचा ऐवज लंपास….

Spread the love

औरंगाबाद : सिडको एन १ मध्ये बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी २० लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणातील घरमालक दिल्लीला तर पत्नी विदेशात गेल्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून घर बंद होते ही संधी साधून चोरट्यांनी आपला हात मारला.


दरम्यान आपल्या दागिन्यांचा विमा उतरवला असल्याने फिर्यादीची पत्नी निश्चिंत होती आणि तशी माहिती शेजाऱ्यांना देऊनच त्या विदेशात गेल्या होत्या या माहितीने पोलीस चक्रावून गेले आहेत. या प्रकरणी सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डाॅ.संजय तोष्णीवाल (५०) एन १ सी.३२१ असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी हे वाशिम येथील विदर्भ फार्मसी इंन्स्टीट्यूट चे संचालक आहेत.

विशेष म्हणजे डाॅक्टर तोष्णीवाल परगावी गेले तेंव्हा शेजार्‍यांना त्यांनी मजूरणीकडून साफसफाई करुन घेण्याचे सांगितले होते. संध्याकाळी लाईट सुरु ठेवण्याचे सांगितले होते.व घराची किल्लीही शेजार्‍याकडेच होती.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार २५ ते ३१ मे च्या दरम्यान फिर्यदीची पत्नी व मुलगी नेदरलॅंड ला गेले होते. तर डाॅ.तोष्णीवाल हे दिल्लीला कामानिमित्त गेले होते. घरफोडी उघंड झाल्यानंतर पोलिसांना प्रश्न पडला की, २० लाखांचे दागिने घरात ठेवून एवढ्या निर्धास्तपणे कोणी परगावी जात का ? यावर शेजारील एका व्यक्तींनी त्यांचे चोरी गेलेले दागिने इन्शूअर्ड होते अशी माहिती दिली. ती पोलिसांनी खात्री केली असता खरी निघाली. म्हणजे दागिन्यांचा तपास पोलिसांनी लावला नाही आणि  मुद्देमाल परत मिळाला नाही  तरी इन्शूरन्स क्लेम मिळणार. त्यामुळे फिर्यादी निर्धास्त असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले.

घरफोडी झाल्याची माहिती डाॅक्टरांनी त्यांच्या पत्नीला फोन करुन दिल्यानंतर नेमका ऐवज किती चोरी गेला. यावर पती पत्नीचे फोनवर कडाक्याचे भांडण झाले. दरम्यान मी येई पर्यंत तक्रार देऊ नका असे डाॅक्टरला त्यांच्या पत्नीने बजावले. घरात ठेवलेल्या दागिन्यांचा इन्शूरन्स काढला आहे आम्ही.. अशी माहिती डाॅक्टरांच्या पत्नीनेच गप्पा टप्पा मारतांना शेजार्‍यांना दिल्याचे पोलिसांना कळले. त्यामुळे डाॅक्टर आणि पत्नीमधे कडाक्याचे वाद झाल्याची माहिती शेजार्‍यांनी पोलिसांना दिली. तरीही पत्नी नेदरलॅंडहून येण्यापूर्वी डाॅक्टरांनी फिर्याद दिलेली आहे.

चोरीला गेलेल्या ऐवजामधे चांदीची नाणी, हिरेजडीत सोन्याचे दागिने, सोन्याचे पेंडलसेट, इयररिंग १ लाख रु. रोख अशा एकूण १९ लाख १ हजार रु. ऐवजाचा समावेश आहे. रात्री उशीरा या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय चौरे करत आहेत. तर गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कल्याण शेळके यांचेही पथक तपासासाठी फिरत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!