Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GoodNews : केंद्र सरकारच्या निर्णयामुळे खाद्य तेलाचे भाव उतरणार

Spread the love

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नागरिकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय अबकारी कर कमी केल्यानंतर आता आता खाद्यतेलांच्या किमती कमी करण्यासंदर्भात आणखी एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार अधिक प्रमाणात कच्चे सोयाबीन आणि कच्चे सूर्यफूल तेल आयात करता यावे म्हणून सीमा शुल्क आणि कृषी सेस दोन वर्षांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.


गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे  केंद्र सरकारचा सीमा शुल्क आणि कृषी सेस दोन वर्षांसाठी हटवण्याचा निर्णय यासह इंडोनेशियाने  पामतेलावरील उठवलेली निर्यातबंदी यामुळे भारतीय ग्राहकांना दिलासा मिळेल असा अंदाज वळविण्यात आला आहे. केंद्र सरकारच्यावतीने  जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार २०२२-२३ आणि २०२३-२४ या दरम्यान दरवर्षी २० लाख मेट्रिक टन कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेल आयातीला सीमाशुल्क आणि कृषी सेस मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळं हे कर न देता खाद्यतेलाची आयात करत येणार आहे.

या निर्णयामुळे खाद्य तेलाचे दर आता आणखी खाली उतरण्याची शक्यता आहे. खाद्य तेलाचे दर कमी करण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने हा  मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बाजारात खाद्य तेलाचे दर यामुळे कमी होतील अशी आशा आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!