Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalUpdate : काँग्रेसला “हात “देऊन , कपिल सिब्बल आता “सायकल”वरून राज्यसभेत …

Spread the love

लखनौ : माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी आज आपण काँग्रेसचा राजीनामा दिला असून सपाच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून राज्यसभेवर जाणार असल्याचा खुलासा केला. सपा कपिल सिब्बल यांना पाठिंबा देत आहे. कपिल सिब्बल यांनी पत्रकारांना सांगितले की, मी 16 मे रोजी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. संसदेत “स्वतंत्र आवाज” असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. स्वतंत्र आवाज बोलला तर तो कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही हे लोकांना कळेल.


या निमित्ताने बोलताना सिब्बल म्हणाले , मी काँग्रेसचा नेता होतो, पण आता नाही, असे सिब्बल म्हणाले. मी 16 मे रोजी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचे आभार मानतो. २०२४ च्या निवडणुकीसाठी आपण सर्व एकत्र येत असून  केंद्र सरकारच्या त्रुटींवर आपण जनतेमध्ये जाऊन प्रकाश टाकणार आहोत.

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी सपा प्रमुख अखिलेश यादव यांची लखनौमध्ये भेट घेतली. कपिल सिब्बल यांना राज्यसभेवर पाठवण्यात आझम खान यांचा मोठा हात आहे. सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात आझमची केस लढवली. आझम यांना जामीन मिळवून देण्यात कपिल सिब्बल यांचे महत्त्वाचे योगदान आहे. सपाकडे राज्यसभेच्या आणखी दोन जागा शिल्लक आहेत, त्यावर शंका कायम आहे. या जागांसाठी डिंपल यादव आणि जावेद अली खान यांची नावे आघाडीवर आहेत.

विशेष म्हणजे, सिब्बल हे काँग्रेसच्या सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते आणि “G-23″ चा भाग होते, 23 असंतुष्टांचा गट होता, ज्याने पक्षाच्या नेतृत्वाची आणि संघटनेची संपूर्ण फेरबदल करण्याची मागणी केली होती. अलिकडच्या आठवड्यात त्यांनी गांधींच्या नेतृत्वावर टीका केली होती. गांधी घराण्याने काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वापासून वेगळे व्हावे आणि दुसऱ्याला संधी द्यावी, असे त्यांनी काही दिवसांपूर्वी ‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. ते म्हणाले की, त्यांना  ‘घर कि काँग्रेस ‘ नकोय तर  ‘सब की काँग्रेस’ हवी आहे. त्यांना उत्तर देताना  छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले कि,  काँग्रेस तर घरोघरी आहे, पण  काही लोकांना ” डिनर आणि मोठ्या बंगल्यावाल्यांची काँग्रेस बनवायची आहे. काँग्रेसच्या संपविण्याची भाषा करणारे सगळे संपले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!