Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BhimaKoregaonViolenceUpdate : भीमा कोरेगाव हिंसाचार : शरद पवार यांची उद्या आयोगासमोर साक्ष

Spread the love

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार भीमा कोरेगाव हिंसचाराची चौकशी करणाऱ्या जे. एन. पटेल आयोगासमोर साक्ष देणार आहेत. उद्या सकाळी साडेदहा वाजता ते आपली साक्ष देणार असल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी शरद पवारांनी आपले अतिरिक्त प्रतिज्ञापत्रही नुकतेच आयोगापुढे सादर केले आहे. दरम्यान यापूर्वी २३ आणि २४ फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहणार होते. मात्र काही कारणास्तव ते हजर राहू शकले नव्हते.

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. पुणे जिल्ह्यात घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवला असला तरी राज्य सरकरातर्फे चौकशी आयोगाचे कामकाज निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे सुरू आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी उसळलेल्या हिंसाचाराला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे जबाबदार असून त्यांनी तेथील वातावरण बिघडवले होते असा आरोप आहे. तसेच या प्रकरणी वस्तुस्थिती आणि पुणे पोलिसांचा तपास यात कमालीचा विरोधाभास आहे, असे पवारांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले होत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची साक्षही चौकशी आयोगाने नोंदवली पाहिजे अशी त्यांची मागणी करणारा अर्ज विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी आयोगाकडे केला होता.

त्यानुसार या घटनेसंदर्भात पवारांकडे यासंदर्भातील काही अधिकची माहिती उपलब्ध असण्याची शक्यता असल्याचे सागर शिंदे यांनी आपल्या अर्जात नमूद केले होतं. त्याची दखल घेत आयोगानं शरद पवार यांना २३ आणि २४ फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याविषयी समन्स पाठवले होते. त्यापूर्वी ४ एप्रिल २०२१ ला शरद पवारांना आयोगापुढे साक्ष देण्यासाठी हजर राहण्याचे समन्स जारी करण्यात आले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!