Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SambhajiBhideNewsUpdate : संभाजी भिडे यांची सखोल चौकशी करण्याची आठवले यांची मागणी

Advertisements
Advertisements
Spread the love

सोलापूर : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे नाव वगळण्यात आले असले  तरी त्यांची सखोल चौकशी करून सबळ पुरावे शोधावे. भिडे गुरुजींवर कारवाई होण्याबाबत आपण आग्रही आहोत अशी प्रतिक्रिया रिपाइं नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. 

Advertisements

रामदास आठवले सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली ही प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisements
Advertisements

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातून संभाजी भिडे यांचे  नाव वगळण्यात आल्याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता आठवले म्हणाले की, “भिडे गुरूजींवर कारवाई व्हायला पाहिजे, ही आपली मागणी कायम आहे. भिडे गुरुजींविरोधातील ठोस पुरावे तपास यंत्रणेला मिळाले नसतील, म्हणून त्यांचे  नाव वगळले  गेले  असेल. पण तरीही त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी आपण ठाम आहोत. त्यासाठी भिडे गुरुजींची आणखी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी आठवले यांनी केली.

नेमकं प्रकरण काय?

१ जानेवारी २०१८ रोजी उसळलेल्या भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात भिडे यांच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ४१ आरोपीं विरोधात यापूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले  होते . त्यात भिडे यांचे  नाव दोषारोपपत्रातून वगळण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून मानवी हक्क आयोगापुढे झालेल्या सुनावणी दरम्यान नुकतीच देण्यात आली.

संभाजी भिडे यांचा हिंसाचार प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे आढळून येत नसल्याचे  पोलिसांनी मानवी हक्क आयोगापुढे सांगितले. या प्रकरणात संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!