Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : औरंगाबादेत आरटीओ कार्यालयात आग , जप्त केलेली वाहने आगीत भासमसात

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद  : औरंगाबाद शहरातील रेल्वेस्टशन परिसरात असलेल्या आरटीओ कार्यालयातील वाहनांना आग लागल्याने कार्यालयात परिसरात उभ्या असलेल्या वाहनांना आग लागली असल्याचे वृत्त आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दल करीत आहे. या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही. ही आग का आणि कशामुळे लागली याचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

Advertisements

आज संध्याकाळी ही घटना घडली. आरटीओ कार्यालयाने जप्त केलेली  चारचाकी आणि तीन चाकी वाहने या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. अचानक आगीचा भडका उडाला आणि वाहनांनी पेट घेतला. प्रारंभी आरटीओ कार्यालयातील कर्मचारी आणि स्थानिकांनी तातडीने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आरटीओ कार्यालयात दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या आगीत अनेक वाहने  पूर्णपणे जळून खाक झाली असून मोठे नुकसान झाले आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!