Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : गोहत्येच्या संशयावरून गोरक्षकांनी घेतला राजारामचा जीव…आणि पत्नीला अद्याप खबरही नाही !!

Spread the love

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील छावला भागात गोहत्येच्या संशयावरून फार्महाऊसच्या केअरटेकरची हत्या करण्यात आली. त्याचे दोन साथीदारही जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून मांसाचे काही अवशेष सापडले असून ते तपासासाठी पाठवण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ४० वर्षीय  राजारामच्या मृत्यूमुळे त्याची पत्नी जाशो आणि त्यांची ४ लहान मुले निराधार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना काही कथित गोरक्षकांनी राजारामवर हल्ला केला. या हल्ल्यात आणखी दोन जण जखमी झाले आहेत. राजारामला एवढी मारहाण करण्यात आली की त्याचा मृत्यू झाला. राजारामचा मृतदेह अजूनही रुग्णालयातच आहे. दरम्यान राजारामचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी पत्नीलाही सांगितले नाही. मात्र गोहत्येची चर्चा पूर्णपणे खोटी असल्याचे राजाराम यांच्या पत्नी जशोने म्हटले आहे. तिने सांगितले कि ,  “हे कसे झाले ते आम्हाला कळले नाही, आम्ही आत झोपलो होतो. आम्ही गाय कापण्याचा विचारही करू शकत नाही.”

राजारामसह ५ जणांना अटक करण्यात आली होती …

राजाराम हा फार्महाऊसचा केअरटेकर होता, तर याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वक्तव्यावरही संशय व्यक्त केला जात आहे. सोमवारी सकाळी फार्महाऊसवर गोहत्येची माहिती मिळाल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता राजारामसह ५ जणांना गोहत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्यात आरोपी शानूने सांगितले की, गोहत्येच्या वेळी काही लोकांनी त्याला मारहाण केली होती. दरम्यान, कथित गोरक्षकांच्या मारहाणीमुळे आरोपी राजारामची तब्येत अधिकच बिघडल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांकडून त्याला मृत घोषित करण्यात आले.त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे  परंतु राजारामचा मारेकरी अद्याप फरार आहे.

गायीच्या दुधावरच आमचा उदरनिर्वाह चालतो …

विशेष म्हणजे राजारामच्या फार्महाऊसमध्ये अनेक गायी आहेत. त्यांची पत्नी म्हणते की ती फक्त या गायींची सेवा करते आणि त्यांचे दूध विकून खर्च चालवते. राजाराम यांचा १४ वर्षांचा मुलगाही गुरुग्राममध्ये एका गोठ्यात काम करतो. राजारामचा मित्र उमेश यानेही सांगितले की, “मी कधीही गोहत्या झाल्याचे ऐकले नाही, पाहिलेले नाही. हा खोटा आरोप आहे. “राजारामच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याच्या जखमा स्पष्ट होतील, पोलीस राजारामला मारहाण करणाऱ्या कथित गोरक्षकाचा शोध घेत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!