Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मोठी बातमी : अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला… सोमय्या पिता -पुत्राचा पोलीस घेत आहेत शोध…

Spread the love

मुंबई  : न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलीस या  पिता-पुत्राचा शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्या नाकात चांगलाच दम आणला होता. दरम्यान किरीट सोमय्यांनी आयएनएस  विक्रांत युद्धनौकेचा निधी लाटल्याच्या प्रकरणात एका माजी सैनिकाने पोलिसात तक्रार देखील केली आहे. या प्रकरणात अटकेचीच ससेमिरा टाळण्यासाठी  किरीट सोमय्या यांनी कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आज न्यायालयात  किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. त्या सुनावणीवर कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला. त्यांनी जमवलेला युद्धनौकेचा निधी जमा केला नसल्याचे  प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आले आहे आणि त्यावरुन कोर्टाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तर नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या या निर्णयाविरोधात आम्ही आता हायकोर्टात दाद मागणार आहोत अशी माहिती किरीट सोमय्या यांच्या वकिलांनी दिली आहे.

सोमय्या यांच्यावर नेमके काय आरोप आहेत ?

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार किरीट सौमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम राबवली होती. आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्यांनी निधीच्या स्वरूपात  पैसे जमा केले होतो. पण जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, अशी माहिती आरटीआयमध्ये उघड झाली. आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी या प्रकरणात राज्यपाल कार्यालयाकडून मागवली माहिती होती. यात असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणी माजी सैनिक बबन भीमराव भोसले यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे.

या प्रकरणात किरीट सोमय्या, निल सोमय्या आणि त्यांचे इतर साथीदार याविरुद्ध अर्ज करण्यात आला आहे. आयएनएस  विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी, करोडोंचा अपहार केल्याचा आरोप केला आहे. २०१३ मध्ये खासदार असताना निधी गोळा केल्याचा आरोप सोमय्यांवर करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी राष्ट्राची आणि जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे किरीट आणि निल सोमय्या या पितापूत्रांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी बबन भोसले यांनी केली आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी कि , भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका “आयएनएस विक्रांत’चा ६० कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला. ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेने १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. १९६१  मध्ये नौदलात दाखल झालेल्या “आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. ‘आयएनएस विक्रांत’चा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ६० कोटींच्या मोबदल्यात ‘आयएनएस विक्रांत’ खरेदी केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!