Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे ब्रिच  कँडी रुग्णालयात दाखल

Spread the love

मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचे वृत्त आहे. त्यांना तातडीने ब्रिच  कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे यांना सायंकाळच्या सुमारास छातीत वेदना जाणवू लागल्यामुळे  त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून, रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

मुंडे यांची तब्येत बिघडल्याचे वृत्त कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ब्रिच कँडी रुग्णालयात जात मुंडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली.  टोपे यांनी धनंजय मुंडे यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधल्याचे सांगितले जात आहे.

धनंजय मुंडे आणि डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली.  डॉ. समधानी हे धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी काही रिपोर्ट काढले असून, ते नॉर्मल आहेत. सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून, काळजी करण्याचे कारण नाही, असे राजेश टोपे यांनी सांगितले. धनंजय मुंडे परभणीत होते. त्यानंतर त्यांचा जनता दरबार होता. धावपळ झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना त्रास झाला असावा. आपण बुधवारी पुन्हा एकदा डॉक्टरांची भेट घेणार असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे. नॉर्मल राहा. चिंता करू नका. जास्त ताण न घेण्याचा मित्रत्वाचा सल्ला आपण मुंडे यांना दिल्याचेही मुंडे म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!