Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा थेट डीसीपीच्या गाडीवर आदळले आणि ….

Spread the love

नवी दिल्ली : थेट डिसिपीच्या गाडीवर गाडी धड्कावून फरार झालेले  पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना गेल्या महिन्यात दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांची  आता जामिनावर सुटका करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. शेखर शर्मा यांना भरधाव वेगात गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी घडली. डीसीपीचे  ड्रायव्हर दीपक कुमार यांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता.


याबाबत एएनआयने दिलेल्या माहितीनुसार पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी त्यांच्या जग्वार लँड रोव्हर गाडीने दिल्लीतील मालवीय नगर भागात मदर इंटरनॅशनल स्कूलजवळ पोलिसांच्या वाहनाला धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते.

पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता हे वाहन ग्रेटर कैलास पार्ट २ येथील रहिवासी विजय शेखर शर्मा चालवत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी विजय शेखर शर्माला अटक केली. मात्र, त्यांची जामीनपात्रावर तत्काळ सुटका करण्यात आली. मोबाइल वॉलेट पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा ३९ वर्षीय असून हे तरुण भारतीय अब्जाधीश आहेत. फोर्ब्सने २०१८च्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत शर्मा यांना $ १.७ अब्ज संपत्तीसह १३९४ व्या स्थानावर ठेवले आहे. शर्मा हे ४० वर्षांखालील एकमेव भारतीय अब्जाधीश आहेत. विजय शर्मा यांनी २०११ मध्ये मोबाईल वॉलेट पेटीएमची स्थापना केली. यासोबतच ई-कॉमर्स व्यवसाय पेटीएम मॉल आणि पेटीएम पेमेंट्स बँक देखील तयार करण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!