Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : शिवस्मारक -भीमपार्क उभारण्याची प्रक्रिया अधिक गतिमान करा : अब्दुल सत्तार

Spread the love

मनिषा पाटील


सोयगाव : महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून फर्दापूर येथे शिवस्मारक व भीमपार्क उभारण्यात येत आहे. शिवस्मारक- भीमपार्कच्या कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने दि.२० रविवार रोजी फर्दापूर येथे महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी तथा शिवस्मारक निर्माण समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थळ पाहणी केल्यानंतर त्यांनी या स्मारक उभारणीची प्रक्रिया गतिमान करा असे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.


असे असेल स्मारक

अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या वाघूर नदीच्या तीरावरील गट नंबर ६७, १०७,१०९,१११ तर ठाणा शिवारातील गट नंबर २९ व ३० मध्ये शिवस्मारक व भीमपार्क यासाठी स्वतंत्र जागा असावी या नियोजित प्रस्तावानुसार महामार्गाच्या एका बाजूस शिवस्मारक तर दुसऱ्या बाजूस भीमपार्क साठी  स्थळ पाहणी पूर्ण झाली आहे.  यासंदर्भात तातडीने सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेश सत्तार यांनी दिले आहेत. याबाबत सविस्तर विकास आराखडा तयार करताना येथील दोन्ही स्मारकाकडे जाण्यासाठी १०० फुटाचा रस्ता तसेच महामार्गावर प्रवेशद्वाराचा समावेश करावा. देश विदेशातील पर्यटक येथे येणार असल्याने त्याप्रमाणे येथे सोयीसुविधा असाव्या, शिवस्मारक व भीमपार्क उभारणाऱ्या कार्यान्वित सर्व यंत्रणेने समनव्यायाने काम करावे, वनविभागाने येथील वनक्षेत्राच्या जागेवर सुशोभीकरण करण्यासाठी कास पठार योजनेच्या धर्तीवर उपाययोजना करण्यासाठी प्रस्ताव सादर करावे त्यासोबतच येथील वाघूर नदीच्या जतन व संवर्धनासाठी प्रस्ताव सादर करण्याचा सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार रमेश जसवंत, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक मोसमी कोसे, सहाय्यक अंजली बडवे, कनिष्ठ अभियंता, पर्यटन प्राधिकरण प्रादेशिक कार्यालयाचे उपअभियंता नगर रचना विभागाचे साहाय्यक संचालज सुमेध खरवडकर, साहाय्यक नगर रचनाकार ओम लहाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक बढे, उपविभागीय अभियंता कुशोर मराठे, अजय टाकसाळ, शाखा अभियंता नितीन राठोड, श्री. दराडे, आकार कन्सल्टन्सीचे कौस्तुभ कुर्लेकर, भूमापक प्रशांत पवार, फर्दापूर पोलीस ठाण्याचे एपीआय अमोल मोरे यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, सिल्लोड तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जि.प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, सिल्लोड कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव, फर्दापूर च्या सरपंच शकीलाबी शेख हुसेन, उपसरपंच हिरा चव्हाण , माजी उपसभापती उस्मान खा पठाण, विजय तायडे, अशोक देशमुख आदींची उपस्थिती होती.

सोयगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या नियोजित जागेची करण्यात आली पाहणी.

दरम्यान फर्दापूर येथे शिवस्मारक व भीमपार्कची स्थळ पाहणी नंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी सोयगाव शहरात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी नियोजित जागेची पाहणी केली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवाय शहरात इतरत्र पर्यायी जागा आहे का याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा आशाबी तडवी, उपनगराध्यक्ष सुरेखाताई प्रभाकर काळे, गटनेते अक्षय काळे आदींसह नगरसेवक आदींची उपस्थिती होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!