Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : रेकाॅर्डवरच्या गुन्हेगारांकडून क्रिकेट सामन्यावर सुरू होता सट्टा, पोलिसांकडून तिघांना बेड्या

Spread the love

औरंगाबाद : वेबसाईटवर आय-डी तयार करुन क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तीन बुकींच्या गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेले दोघे रेकाॅर्डवरचे गुन्हेगार आहेत.अशी माहिती गुन्हेशाखेने दिली. ही कारवाई रविवारी रात्री जिन्सी भागात करण्यात आली.


मिळालेल्या माहितीनुसार, या बुकींकडून पोलिसांनी रोख, बेटिंगसाठी वापरलेले मोबाईल असा ७५ हजारांचा ऐवज जप्त केला. सय्यद रियाज सय्यद शकील (३८, रा. गल्ली क्र. १४, बायजीपुरा), तरबेज खान कलीम खान (३०, रा. आलमगीर कॉलनी), शेख मुजाहिद शेख शाहरुख (३०, रा. मिसारवाडी) अशी अटकेतील बुकींची नावे आहेत.
यातील तरबेजखान कलीमखान,शेख मुजाहिद शेख शहारुख आणि नाशिकचा सद्दीम शेख यांच्यावर यापूर्वी सट्टा खेळवण्याचे गुन्हे दाखल आहेत. तर रियाज हा नवीन आहे.

क्रिकेट सामन्यावर सय्यद रियाज हा सट्टा घेत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पथकाने रियाजच्या घरावर छापा मारला. एका संकेतस्थळावर वैयक्तिक आयडी बनवून तो त्याआधारे सिडनी सिक्सर विरुद्ध पर्थ स्क्रोच या संघाच्या क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजांकडून सट्टा घेत असल्याचे समोर आले. रियाजने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी आलमगीर कॉलनीतून इतर दोन बुकींना अटक केली.

या सामन्यावरील सट्टा घेण्यासाठी लागणारा आय-डी नाशिक येथील सद्दाम शेख याने तयार केला होता. अशी माहिती पोलिसांना तिघांनी दिली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी रोख ४७ हजार ५०० रुपये आणि मोबाईल असा ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, सहायक फौजदार सतीश जाधव आदींनी कारवाई केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!