Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MHADA EXAM । म्हाडा परीक्षाचे सुधारीत वेळापत्रक जारी

Spread the love

अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे म्हाडाच्या होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुधारीत वेळापत्रकानुसार ही परीक्षा २९ जानेवारी रोजी होणार होती. परंतु, एमपीएससीच्या पोलीस निरिक्षक पदासाठीची परीक्षाही याच दिवशी होणार आहे. त्यामुळे म्हाडा परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे. यानुसार ७ फेब्रुवारी ,८फेब्रुवारी , आणि ९ फेब्रुवारी रोजी म्हाडाच्या परीक्षा होणार आहेत.

म्हाडा प्राधिकरणाची क्लस्टर ६ मधील सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक या संवर्गासाठी २९ आणि ३० जानेवारी या दिवशी सहा सत्रांमध्ये परीक्षा होणार होती. परंतु, एमपीएससी आणि म्हाडा प्राधिकरणाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने म्हाडा ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मागच्या वर्षी घेण्यात येणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर सुधारीत वेळापत्रकानुसार ही परीक्षा २९ जानेवारी २०२२ रोजी होणार होती. परंतु एमपीएससीच्या पोलीस निरिक्षक पदासाठीची परीक्षाही याच दिवशी म्हणजे २९ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जाणार होत्या. यामुळे विद्यार्थी गोंधळात पडले होते. त्यामुळेच आता म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार म्हाडाच्या परीक्षा ७,८ आणि ९ फेब्रुवारी रोजी होणार आहेत.

https://mhadarecruitment.in/

MHADA EXAM । म्हाडाच्या पेपर फुटीच्या प्रकरणात चौकशीला वेग, सहा आरोपींना पोलीस कोठडी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!