IndiaNewsUpdate : सकारात्मक बातमी : अखेर ‘त्या ” मागास स्वयंपाकी महिलेला घेतले कामावर !!
नवी दिल्ली : देशाच्या घटनेने अस्पृश्यता कायद्याने नष्ट केलेली असली तरी अनेक वेळा हि व्यवस्था चालू असल्याचे दिसून येते उत्तराखंडमधील चंपावत जिल्ह्यातील सुखीधांग इंटर कॉलेजमध्ये जेवण बनवण्यावरून असाच वाद झाला होता. आधी दलित प्रवर्गातील महिलेने बनवलेले जेवण जेवण्यास उच्च जातीमधील मुलांनी नकार दिला होता. माध्यान्ह भोजन देणाऱ्या दलित समाजाच्या महिलेने उच्चवर्णीय विद्यार्थ्यांसाठी शिजवलेले जेवण खाण्यास नकार दिल्याने तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर दलित प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उच्च जातीमधील महिलेने तयार केलेल्या जेवणावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, या महिलेला पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आले असल्याचे वृत्त आहे.
याबाबत इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानंतर मोठी खळबळ उडाली होती या घटनेची सर्वत्र निंदा करण्यात येत होती . या वृत्तानुसार उत्तराखंडमधील एका शाळेतील उच्चवर्णीय विद्यार्थ्यांनी तिने बनवलेले दुपारचे जेवण खाण्यास नकार दिल्याने नोकरीवरून काढण्यात आलेल्या सुनीता देवी या दलित स्वयंपाकी महिलेची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. ३२ वर्षीय महिलेची पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय शाळेच्या व्यवस्थापन समितीने घेतला.
तिची पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारी आदेशाच्या आधारे घेण्यात आला होता. तसेच सुनीता देवी यांच्या विरोधात जातीय अपशब्द वापरल्याबद्दल आणि धमकावल्याबद्दल ३१ जणांविरुद्ध एससी/एसटी कायद्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, एफआयआरमध्ये महेश चौराकोटी, दीपा जोशी, बबलू गेहतोरी, सतीश चंद्र, नागेंद्र जोशी आणि शंकर दत्त या सहा जणांची नावे आहेत.
सुनिता देवी म्हणाल्या की, “मला आशा आहे की यानंतर अशी कोणतीही अडचण येणार नाही.” दरम्यान, सुनीताच्या नियुक्तीबाबत तक्रार करणाऱ्या पालकांनी नियुक्तीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा केला होता. मात्र आता सोमवारी इयत्ता सहावी ते आठवीच्या ६६ पैकी ६१ मुले सुखीधांग येथील शाळेत पोहोचली होती. दुपारी अनुसूचित जाती आणि उच्च जातीच्या मुलांनी एकत्र जेवण केले. यासोबतच मुलांमध्ये सकारात्मक विचार रुजवण्यासाठी मुख्य शिक्षणाधिकारी, मूलभूत शिक्षणाधिकारी व शिक्षकांनी त्यांच्यासोबत भोजन केले. यावेळी विमलेश उप्रेती, यांनी जेवण बनवले होते.
उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यातील सुखीधांग येथील भोजनमाता प्रकरणावरून आठवडाभर चाललेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. सीईओ, बीईओ आणि शिक्षकांनी सोमवारी येथील शाळेत पोहोचलेल्या सर्व सवर्ण आणि अनुसूचित जातीच्या मुलांसोबत जेवण केले. मध्यान्ह भोजन सवर्ण भोजनमातेने तयार केले होते. मात्र, वादाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी समितीचा तपास सुरूच राहणार आहे.