AurangabadNewsUpdate : उत्तम परताव्याचे अमिष दाखवत २४ लाखांचा गण्डा , आरोपीचे बॅंक खाते सीझ

औरंगाबाद – उत्तम परताव्याचे आमिष दाखवत गेल्या एका वर्षांपासून २४ लाख रुपयांना फसवणाऱ्या भामट्याविरोधात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा जिन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हेशाखेने आरोपीला चौकशीसाठी आज पोलीसआयुक्तालयात बोलावले होते. दरम्यान वरिष्ठ सूत्रांनी आरोपीचे बॅंक खाते सीझ केल्याची माहिती दिली
प्रवीण दादाराव शेकोकर रा. कुंभेफळ शेंद्रा असे आरोपीचे नाव आहे. त्याने गारखेड्यातील शाकुंतल नगर येथील सिद्धीक अपार्टमेन्ट येथे राहणाऱ्या अभिजित अनिल गोजेकर (४१) यांच्या सहीत ७ ते ८ जणांकडून ११ नोव्हेंबर १९ रोजी ४९ लाख रु. घेतले होते. त्यापैकी २५ लाख परतावा म्हणून फिर्यादींना परत दिले. पण कोविड मुळे परतावा देणे शक्य नसल्याचे सांगत हात झटकले .त्यामुळे फिर्यादींनी कंटाळून आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल यांनी प्राथमिक तपास पूर्ण केला . त्यानंतर वरील तपास मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्याकडे सोपविण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्तां यांनी दिले.