Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangbadNewsUpdate : मनसेच्या हाकलपट्टीला ५७ पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने उत्तर

Spread the love

औरंगाबाद : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यानंतर झालेल्या संघटनात्मक बदलामुळे मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.   त्याचा परिणाम म्हणून  मंगळवारी मनसेच्या चार पदाधिकऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. तर आज त्याच हकालपट्टीला उत्तर देतांना ५७ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबाद दौरा केला होता. या दौर्‍यात त्यांनी मनसेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांचा पद काढून घेतले होते. त्यांनतर नाराज दाशरथे समर्थकांनी सोशल मीडियावरून आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पक्षाची सोशल मीडियावर बदनामी करण्याचे कारण देत मंगळवारी चार पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे या नाराज पदाधिकारी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना हकालपट्टी झालेल्या पदाधिकऱ्यांना आरोप केला आहे की, स्थानिक पदाधिकारी यांनी मंगळवारी काढलेले पत्रक म्हणजे अत्यंत अपमानकारक आणि दबाव तंत्राचा वापर करून महाराष्ट्र सैनिकांना बदनाम करण्याची कट-कारस्थान आहे. त्यामुळे आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक नवयुक्त पदाधिकार्‍यांच्या कपटी आणि दुजाभाव करणाऱ्या वृत्तीला कंटाळून सामूहिक राजीनामे देत असल्याची माहिती दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!