AurangabadCrimeUpdate : गुन्हे शाखेच्या दोन कारवायात तिघांना बेड्या,१० लाखांचा मुद्देमाल जप्त

एक मोटारसायकल चोर दोन ट्रक चोर अटक
औरंगाबाद : गुन्हेशाखेने केलेल्या दोन कारवायात तिघांना १० लाखांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना बेड्या ठोकल्या. जप्त केलेल्या मुदडी मालात ६ लाख ५० हजारांचा ट्रक व २लाख ९० हजाराच्या १३ मोटारसायकलींचा समावेश आहे. वरील प्रकरणी बेगमपुरा आणि वाळूज औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देविदास तोताराम शिखरे,रा. गांजगाव , असे मोटरसायकल चोरांचे नाव आहे. तर तर्क चोरीतील बाळकृष्ण इंगळे(३०), आणि तात्या दाणे(३७) दोघेही रा. बजाजनगर असे ट्र्क चोरांचे नाव आहे. २६ नोव्हेंबर रोजी हा तर्क चोरी झाल्याचा गुन्हा वाळूज औद्योगिक पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. तर मोटारसायकल चोरीचे गुन्हे बेगमपुरा आणि वाळूज औद्योगिक पोलीस ठाण्यात दाखल होते मोटारसायकल चोर देविदास शिखरे याने चोरलेल्या मोटरसायकल घरासमोर उभ्या करून ठेवल्याची माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली होती . त्यानुसार त्यानुसार पोलीस उपायुक्त अपर्णाला गीते यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सोनटक्के व पीएसआय दत्ता शेळके यांनी वरील दोन्ही कारवाया पार पाडल्या त्यांचा सोबत पोलीस कर्मचारी अझहर कुरेशी, किरण गावंडे, संजयसिंह राजपूत सतीश जाधव, ज्ञानेशवर पवार, परबत म्हस्के, यांनी सहभाग घेतला होता.