CoronaMaharashtraUpdate : काय आहे महाराष्ट्राची कोरोनाची आजची अवस्था ?

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात शुक्रवारी कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसख्येत किंचित वाढ झाली असली तरी आज मृ्त्युसंख्येत घट झाली आहे. आज राज्यात एकूण ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ६६५ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर ८५२ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर, राज्यात आज ८ हजार १०६ रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरू आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ८० हजार ०६१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ५१ लाख ५५ हजार २९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ३२ हजार ७२३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १०.१८ टक्के इतके आहे. सध्या राज्यात ७८ हजार १२२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर १ हजार ०५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. याबरोबरच, राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४० हजार ८९१ इतकी आहे.
मुंबई ठाणे हद्दीतील रुग्णसंख्या
दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत आज बुधवारी २२४ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर मुंबईतील करोना बाधितांची आजपर्यंतची एकूण संख्या ७ लाख ६२ हजार १६४ इतकी झाली आहे. तसेच मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आजपर्यंत मुंबईत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १६ हजार ३२२ इतकी आहे. तर ठाणे जिल्ह्यात आज बुधवारी नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यांपैकी ठाण्यात २४, ठाणे महापालिका क्षेत्रात २८, कल्याण-डोंबिवलीत १९, नवी मुंबईत ३३, मिरा-भाईंदरमध्ये १२, उल्हासनगरमध्ये ३, भिवंडी निजामपूरमध्ये १ रुग्ण आढळला. तर, उल्हासनगरमध्ये ३ रुग्ण आढळले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात ८ नवे रुग्ण
औरंगाबाद जिल्ह्यात आज ८ रुग्णांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष ४५ हजार ७७८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण ८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष ४९ हजार ५२३झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार ६३३जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ११२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.