Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुनीत राजकुमार यांच्या चाहत्याची आत्महत्या तर दोघांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Spread the love

कन्नड सुपरस्टार अभिनेता पुनीत राजकुमार यांचे ४६व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे शुक्रवारी निधन झाले. पुनित यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. एका चाहत्याची आत्महत्या तर दोघांचे  कार्डिअॅक अरेस्टच्या झटक्यामुळे निधन झाले आहे. पुनीत यांच्या मृत्यूची माहिती मिळताच सर्व चाहते रुग्णालयाबाहेर जमा झाले होते. सोशल मीडियावर काही फोटोही व्हायरल झाले आहेत.

कर्नाटकमधील चामराजनगर जिल्ह्यातील मारो गावातील 30 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या चाहत्याचे नाव मुनियप्पा असल्याचे समजतेय. त्याच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. स्थानिकांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुनियप्पा सुपरस्टार पुनीत यांचा फॅन होता. पुनित यांचा प्रत्येक चित्रपट तो पाहत होता. पुनित यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच मुनियप्पा ढसाढसा रडू लागला. अशातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारावेळीच त्यांचा मृत्यू झाला. बेळगावमधील शिंदोली गावातील परशुराम देमन्ना यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. पुनित यांच्या निधनाचे वृत्त ऐकून ते निराश होते. अशातच रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. तसेच, राहुल गादिवादारा नावाच्या चाहत्याने आधी पुनित यांच्या फोटोची पूजा केली. फूल आणि माळांनी फोटो सजवला. त्यानंतर आपल्या घरात गळफास घेत आयुष्य संपवले.

शुक्रवारी अभिनेता पुनीत राजकुमार यांना सकाळी 11.30 वाजता छातीत दुखू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टारांनी त्यांच्यावर उपचार केले मात्र, उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्याला अप्पू म्हणत होते. पुनित दिग्गज अभिनेते राजकुमार आणि पार्वतम्मा राजकुमार यांचा मुलगा होता. पुनित राजकुमार यांनी 29 पेक्षा जास्त कन्नड चित्रपटात अभिनय केला आहे. बाल कलाकार म्हणून पुनित यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता. ‘अभी’, अप्पू, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरासु’, ‘राम’, ‘हुडुगारु’ आणि’अंजनी पुत्र’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. पुनित राजकुमार यांचा युवारत्न  हा चित्रपट खेरचा ठरला.

 


आपलं सरकार

Click to listen highlighted text!