Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर कॅरोटिड आर्टेरी रिवास्क्युलराईजेशन शस्त्रक्रिया

Advertisements
Advertisements
Spread the love

सर्वांचे लाडके सुपरस्टार रजनीकांत यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रजनीकांत यांना चक्कर आल्याने त्यांना 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चेन्नईतील कावेरी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements

रजनीकांत यांच्यावर शुक्रवारी महत्वाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. त्यांना चक्कर आल्याने आधी त्यांचे रुटिन चेकअप करण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांनी महत्वाचा निर्णय घेऊन, कॅरोटिड आर्टेरी रिवास्क्युलराईजेशन ही शस्त्रक्रिया केली आहे. मेंदुला होणारा रक्तपुरवठा पुनर्संचयित करण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते. रजनीकांत यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रियेची माहिती कावेरी रूग्णालयाकडून एक परिपत्रक जारी करून देण्यात आली आहे. रजनीकांत यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहितीही रूग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे रजनीकांत सध्या रूग्णालयातच असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे.

Advertisements
Advertisements

याआधीही एकदा रजनीकांत यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 25 डिसेंबर 2020 रोजी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल होते. त्यानंतर त्यांना लगेच 27 डिसेंबरला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा रजनीकांत रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या रूग्णालयाबाहेर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

 


आपलं सरकार

Click to listen highlighted text!