Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : ‘तारक मेहता’मधील नट्टू काका फेम अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘तारक मेहता’मधील नट्टू काका फेम अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. अखेर उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

Advertisements

गेल्या काही दिवसांपासून घनश्याम तारक मेहता सिरीयलमध्ये दिसत नव्हते. लॉकडाऊननंतर शूट झालेल्या एपिसोडमध्ये नट्टू काका दिसले नसल्याने चाहत्यांनाही प्रश्न पडला होता. सोशल मीडियावरही होणाऱ्या उलट-सुलट चर्चांनंतर घनश्याम यांची प्रकृती ठीक नसल्याचे समोर आले होते.दरम्यान घनश्याम यांना मागील वर्षी कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर किमोथेरपी केली जात होती याबद्दल त्यांच्या मुलगा विकास याने माहिती दिली होती.’ मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांच्या गळ्याचे ऑपरेशन करण्यात आले होते . ज्यातून त्यांच्या ८ गाठी काढण्यात आल्या होत्या.”

Advertisements
Advertisements

पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नट्टू काका लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा तारक मेहतामध्ये परतावेत यासाठी चाहत्यांसह सिरीयलमधील टीमही प्रार्थना करत होती. मात्र, गेल्या महिन्याच्या उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाली नाही. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. घनश्याम नायक गेल्या १० वर्षांपासून तारक मेहतामध्ये नट्टू काकांची भूमिका निभावत होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!