Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NashikNewsUpdate : आ. सुहास कांदे धमकी प्रकरणी अक्षय निकाळजे नाशिक पोलिसांसमोर हजर

Spread the love

नाशिक : शिवसेनेचे नाशिकचेआमदार सुहास कांदे यांना मोबाइलवर धमकी मिळाल्याच्या तक्रारीची दाखल घेऊन पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. याबाबत नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या आदेशानुसार आरपीआय ( ए ) गटाचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. या समन्सनुसार निकाळजे हे आता नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात शेकडो कार्यकर्त्यांसह हजर झाले.

नाशिकचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना फोनवरून थेट छोटा राजन टोळीकडून धमकी मिळाल्याची तक्रार आ. कांदे यांनी पोलिसांकडे केली असून . यामुळे नाशिक जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. दरम्यान या धमकी प्रकरणाची पोलीस आयुक्तालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच कांदे यांच्यासह छोटा राजनचा पुतण्या आणि रिपाइं-आंबेडकर गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांना शहर पोलिसांकडून जबाब नोंदविण्यासाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर ते चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात एका बैठकीत विकासनिधीच्या विषयावरून वादविवाद झाले होते या वादातून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी आपल्याला छगन भुजबळांविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी म्हणून भुजबळांच्या नावे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या टोळीचा फोन आल्याचा आरोप केला होता. मात्र, हे आरोप छोटा राजनचा पुतण्या आणि रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांनी फेटाळून लावले होते. त्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हि चौकशी होत आहे.

माझा भुजबळांचा काहीही संबंध नाही : निकाळजे

दरम्यान या प्रकरणात अक्षय निकाळजे यांनी खुलासा करताना आधीच म्हटले आहे  की, आमदार सुहास कांदे यांचे भाऊ टोलनाका चालवतात. या टोलनाक्यावर आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली होती. त्यासाठी मी सुहास कांदे यांना फोन केला होता. त्यांना फोनवर मी कुठलिही धमकी दिली नाही. छगन भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या, असे म्हणालो नाही. मी कधीही मंत्री छगन भुजबळ यांना भेटलो सुद्धा नाही. त्यामुळे मी आमदारांचीच तक्रार करणार आहे. त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार आहे. त्यांनी लोकप्रियतेसाठी हे केले. माझा भुजबळांचा काहीही संबंध नाही. कांदे विनाकारण पोलिसांची दिशाभूल करत आहेत. या प्रकरणी आम्हाला विनाकारण गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करू. याबाबत गृहमंत्री, पोलीस महासंचालकांकडे आपण तक्रारही  करणार आहोत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!