Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NagpurNewsUpdate : नागपुरातील धम्मचक्र प्रवर्तन दिनाची मोठी बातमी

Spread the love

नागपूर : कोरोनामुळे  राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घातल्याने ,  याही वर्षी बौद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या नागपुरातील दीक्षाभूमीवर मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळा साजरा होणार नसल्याचे प्रशासनाने कळवले आहे. त्यामुळे याठिकाणी कोणीही गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने आज या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.

या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि , राज्य शासनाने २४ सप्टेंबर रोजी निर्गमित केलेल्या धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबतच्या आदेशामध्ये मुद्दा क्रमांक ४ (xv ) अनुसार मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंधीत केले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने नागपूर दीक्षाभूमीवर आयोजन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी अध्यक्षांशी ३० सप्टेंबरला बैठक घेतली आणि  राज्य शासनाच्या दिशा निर्देशानुसार मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्याबाबतची सूचना केली. तसेच नागपूर महानगरपालिका, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग व अन्य प्रमुख विभागाशीही या संदर्भात चर्चा केली. राज्य शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येण्याच्या कार्यक्रमांना प्रतिबंधित करण्यात आले आहे.

दरवर्षी अशोक विजया दशमीच्या दिवशी नागपुरातील दीक्षाभूमीवर धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने राज्यातून आणि देशभरातून लाखो आंबेडकरी  येथे एकत्र येऊन दीक्षाभूमीला वंदन करतात. या पार्श्वभूमीवर १५ ऑक्‍टोबर रोजी बौद्ध अनुयायांनी या ठिकाणी कोणतीही गर्दी न करता राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे कोवीड- १९चा प्रोटोकॉल पाळणे आवश्यक असल्याने दरवर्षी होणारा हा अभिवादन सोहळा, यावर्षी होऊ शकणार नाही असे प्रशासनाने कळविले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!