Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMumbaiUpdate : राज्यात ३ हजार ५८६ नवे रुग्ण , ४ हजार ४१० रुग्णांना डिस्चार्ज

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात आज दिवसभरात ४ हजार ४१० रूग्ण बरे होऊन घरी परतले असून, ३ हजार ५८६ नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, ६७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे. राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.

Advertisements

दरम्यान राज्यात आजपर्यंत एकूण ६३, २४, ७२० कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०८ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,१५,१११ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३८३८९ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,६७,०९,१२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,१५,१११ (११.४९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८१,०७२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर १,८१३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ४८,४५१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!