CoronaMaharashtraUpdate : चिंताजनक : सक्रिय रुग्णांची संख्या वाढू लागली , राज्यात ३ हजार ८९८ इतक्या नव्या रुग्णांची नोंद

मुंबई: राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार ८९८ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार ६२६ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार ५८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ५ हजार ९८८ इतकी होती. तर, आज ८६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ३७ इतकी होती.
आज राज्यात झालेल्या ८६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ०४ हजार ३३६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के इतके झाले आहे. राज्यात कालच्या तुलनेत आज करोना बाधितांच्यादैनंदिन रुग्णसंख्या मात्र किंचित वाढली असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील मोठी घट झाली आहे. या बरोबरच आज झालेल्या मृत्यूंच्या संख्येत कालच्या तुलनेत वाढ झाली आहे. तसेच कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील थोडी वाढली असल्याने आजची स्थिती तुलनेने चिंताजनक आहे.
सक्रिय रुग्णसंख्येतील वाढ चिंताजनक
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४७ हजार ९२६ वर आली आहे. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १२ हजार ४०९ वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या वाढून ती ७ हजार ४५९ वर आली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ५ हजार ६०६ इतकी खाली आली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ४ हजार ३३१ अशी वाढली आहे. तर, सांगलीत एकूण २ हजार ७०८ वर खाली आली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ६४८ वर खाली आली आहे.
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ४ हजार १६५ इतकी आहे. तर, रत्नागिरीत १ हजार १०४, सिंधुदुर्गात ८३२, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८५७ इतकी आहे. भंडारा जिल्ह्यात एक सक्रिय रुग्ण असून या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४३७, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७२ इतकी वाढली आहे. अमरावतीत ही संख्या ७६ वर आली आहे. तर भंडारा जिल्ह्यात फक्त एक सक्रिय रुग्ण आहे. हीच राज्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.
३,०६,५२४ व्यक्ती होम क्वारंटाईन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५१ लाख ५९ हजार ३६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ९३ हजार ६९८ (११.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ०६ हजार ५२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर, २ हजार ०२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.