VidarbhaNewsUpdate : दुःखद : नदीतील आंघोळ जीवावर बेतली , ५ पर्यटक तरुणांचा बुडून मृत्यू !!

नागपूर : रविवारची सुट्टी घालविण्यासाठी आलेल्या यवतमाळच्या दिग्रस मधील ५ तरुणांचा नागपुरातील कन्हान नदीत बुडून मृत्यू झाला. हे तरुण नागपुरातील अम्मा दर्ग्याच्या दर्शनासाठी आले होते.सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हे तरुण कान्हान नदीत आंघोळ करायला उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने प्रारंभी एक तरुण बुडाला आणि त्यापाठोपाठ एक-एक करुन हे पाचही तरुण नदीत बुडाले.
प्राथमिक माहितीनुसार आज रविवारी सकाळी यवतमाळच्या दिग्रस संकुलातील १२ लोक अम्मांच्या दर्ग्यावर आले होते. यातील काहीजण जवळच असलेल्या कन्हान नदीत अंघोळ करण्यासाठी गेले उतरले. या नदीतील पाण्याची पातळी जास्त होती आणि नदीच्या पाण्याचा प्रवाह मोठा होता ज्याचा अंदाज या तरुणांना आला नाही. त्यामुळे नदीत पोहोण्याचा आनंद घेणारे हे तरुण नदीच्या प्रवाहात अचानक बुडाले .
या तरुणांमध्ये सय्यद लकी , २२ , अयाज बेग २० , अबुंके बेग १८ , सिब्दान शेख २१ , खवडजा बेग १७ या तरुणांचा समावेश आहे. वाहून गेलेल्या तरुणांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस ठाण्याचे प्रभारी आपल्या टीम बचाव फोर्ससह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी स्थानिक नागरिकही पोलिसांच्या मदतीला धावून आले आहेत.