Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : मोठी कारवाई , अमेरिकेकडून इसिसच्या अड्ड्यांवर बॉम्बहल्ले

Spread the love

वॉशिंग्टन : अमेरिकने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इशारा दिल्याप्रमाणे अमेरिकेने शनिवारी पहाटे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनांच्या तळांवर ड्रोनने बॉम्ब हल्ले केले केले असल्याचे वृत्त आहे. काबूलमधील हल्लेखोरांना सोडणार नाही असे बायडेन यांनी गुरुवारी स्पष्ट केल्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये अमेरिकेने काबूल विमानतळावर हल्ला केल्यानंतर जबाबदारी स्वीकारणाऱ्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तळांवर बॉम्ब हल्ले केले आहेत.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पँटागॉनने या हल्ल्याची माहिती दिली आहे. काबूल विमानतळावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात १३ अमेरिकी सैनिकांसह १०५ लोक ठार झाले होते. दरम्यान इस्लामिक स्टेटच्या खुरासान मॉडेलने म्हणजेच आयएसआयएस के या संघटनेनं बॉम्ब हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती त्यामुळे अमेरिका खवळला आहे. आयएसआयएसच्या तळांवर आणखीही हल्ल्याची शक्यता असल्याने अमेरिकने वर्तविली असून लवकरात लवकर येऊन आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत.

दरम्यान न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन लष्कराने हे हल्ले नानगहर प्रांतामध्ये केले. सुरक्षेच्या कारणांमुळे अमेरिकन नागरिकांना विमानतळांच्या वेगवेगळ्या प्रवेशद्वारांपासून तात्काळ दूर होण्यास सांगण्यात आलं आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी यासंदर्भातील माहिती जारी केली असून त्यांनी म्हटले आहे कि, “अमेरिकन लष्कराने एक आयएसआयएस के प्लॅनरविरोधात दहशतवादीविरोधी मोहीम राबवली आहे,” मात्र या ड्रोन हल्ल्यांमुळे आयएसआयएसला किती नुकसान झाले याची माहिती अद्याप समोर आली नाही तरी प्राथमिक अंदाजानुसार काबूल विमानतळावर आत्मघाती हल्ला करणाऱ्यांचा खात्मा करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

या हल्ल्याबाबत कॅप्टन अर्बन यांनी आणखी स्पष्ट करताना म्हटले आहे कि , “हा मानवविरहित हल्ला होता. जो अफगाणिस्तानमधील नानगहर प्रांतात करण्यात आला. प्राथमिक अंदाजानुसार आम्हाला लक्ष्य साध्य करण्यात यश आलं असून आम्ही त्यांचा खात्मा केला आहे. या हल्ल्यात कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळालेली नाही,” विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने मागील २० वर्षांमध्ये अशाप्रकारे अफगाणिस्तानमध्ये केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. व्हाईट हाऊसचे प्रसारमाध्यम सचिव जेन साकी यांनी शुक्रवारी (स्थानिक वेळेनुसार) दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन अधिकाऱ्यांनी काबूलमध्ये आणखीन एका दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त केलीजात आहे. अजूनही धोका कायम असून आमच्या सैनिकांच्या जीवालाही धोका आहे असे साकी यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!