Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : अमेरिकेकडून दहशतवाद्यांच्या विरोधात पुन्हा एअर स्ट्राईक

Spread the love

काबुल : पुन्हा एकदा अमिरेकेच्या सैन्याने अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी काबुलमध्ये आणखी एक एअर स्ट्रइक केला आहे. एका गाडीतून स्फोटकांसह जात असलेला आत्मघाती हल्लेखोर अमेरिकेच्या कारवाईत ठार झाला आहे. स्फोटकांनी भरलेली कार घेऊन अफगाणिस्तानातून बाहेर पडत असलेल्या अमेरिकेच्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी हा हल्लेखोर जात होता. यादरम्यान, काबुल विमानतळाजवळ रहिवासी भागात एक रॉकटे हल्लाही झाला आहे. यात दोन ठार, तर तीन जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान एकीकडे अमेरिकेने आत्मघाती हल्ल्यासाठी निघालेल्या दहशतवाद्याला एअर स्ट्राइक करून टिपलं असताना दुसरीकडे काबुल विमानतळाजवळ रॉकेट हल्ला झाला आहे. यात एका मुलाचा मृत्यू झाला असून संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं आहे. दोन्ही घटना वेगवगेळ्या असल्याचं बोललं जात आहे. पण सध्यातरी प्राथमिक माहिती समोर आली आहे. विमानतळाजवळील रॉकेट हल्ला आणि अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या एअर स्ट्राइकचा काही संबंध आहे का? हे स्पष्ट झालेलं नाही.

तालिबान संतप्त, ३१ तारखेनंतर अमेरिकेला तालिबानकडून उत्तर

अमेरिकेने ड्रानद्वारे हवाई हल्ला केला आहे. हा हल्ला एका कारमधून येणाऱ्या आत्मघातकी हल्लेखोरांवर करण्यात आला आहे, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. कारमध्ये अनेक आत्मघाती हल्लेखोर होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर स्फोटकं होती, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमुळे तालिबान संतप्त झाला आहे. ३१ ऑगस्टनंतर अफगाणिस्तानमध्ये कुठलीही लष्करी कारवाई करण्याचा अधिकार अमेरिकेला राहणार नाही, असे तालिबानने म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये ३१ तारखेनंतर अमेरिकेने कुठलाही हल्ला केल्यास त्याला तालिबानकडून उत्तर मिळेल, असा इशाराही तालिबानने दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!