Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : २०२४ मध्येही ४०० पेक्षा अधिक जागा भाजपलाच मिळतील : चंद्रकांत पाटील

Advertisements
Advertisements
Spread the love

कोल्हापूर : देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसरी आघाडी उभी करण्याच्या जोरदार हालचाली सुरू असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी,  २०२४ मध्ये कुणाच्याही नेतृत्वात निवडणूक लढवा भाजप ४०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

Advertisements

इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारलाही जनता परत पाठवणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ‘एकाने मारायचे दुसऱ्याने समजवायचे ‘ असा खेळ राज्य सरकारमध्ये सुरू आहे, हा खेळ न कळण्याइतकी महाराष्ट्राची जनता मूर्ख नाही, त्याची शिक्षा त्यांना निवडणुकीत मिळेल, सरकारचे  नाटक चालू आहे त्याला लोकं विटली आहेत, असा घणाघातही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Advertisements
Advertisements

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली, त्यांनी अतिशय परिपक्व असल्याचे  दाखवून दिले.  गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रातील भाजपला संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळख निर्माण करून दिली. अशा घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही, असे  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!