Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : अनिल देशमुख यांच्या पत्नीलाही ईडीचे समन्स

Spread the love

मुंबई :राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना ईडीने समन्स बजावली असून त्यांना उद्या सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे यांनी याविषयीची माहिती दिली आहे. सीबीआयने आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने या याचिकेचा निकाल राखून ठेवला आहे. मात्र, अद्याप ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे.

दरम्यान ईडीने आत्तापर्यंत देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश, त्यांची पत्नी आरती यांना समन्स बजावलेले आहे. मात्र त्यांच्यापैकी कोणीही अद्याप चौकशीला सामोरं गेलेले नाही. याबद्दल देशमुख यांचे वकील घुमरे यांनी सांगितले  की, ईडीला आम्ही वारंवार पत्राद्वारे विनंती केली आहे की तुम्हाला जे काही हवे  आहे ते सांगा आम्ही देऊ. तसेच सध्याच्या करोनाच्या परिस्थितीमुळे जर सगळे  ऑनलाईन सुरु आहे तर चौकशीही ऑनलाईन माध्यमातून घ्या अशी आम्ही मागणी केली आहे.

भुमरे म्हणाले, अनिल देशमुख आणि त्यांच्या पत्नी दोघेही ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत त्यांची चौकशी ऑनलाईन माध्यमातून व्हावी. अशी कोणती गोष्ट आहे की जी समोर बसूनच तुम्हाला मिळणार आहे? देशमुख तुमच्या चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. ही चौकशी ऑनलाईन माध्यमातून व्हावी, अशी मागणी आम्ही ईडीकडे करत आहोत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!