Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : कोरोना नियम , नो एक्स्क्यूज : अन्यथा कडक निर्बंध

Spread the love

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र नागरीकांनी मोठ्या प्रमाणाक गर्दी करायला सुरवात केली आहे. तज्ज्ञांनी कोरोना साथीच्या तिसर्‍या लाटेचा इशारा दिल्यानंतरही लोक खबरदारी घेत नाहीत. राज्यांनी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक पर्यटनस्थळे आणि बाजारपेठेत मोठी गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत.


दरम्यान राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या लागून आहे ते तसेच राहणार आहे, असे  राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. राज्यमंत्रिडळाच्या या बैठकीत निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा झाली. निर्बंध शिथिल केले जाईल अशी शक्यता होती, पण जैसे थेच परिस्थिती ठेवण्यावरच सरकारला कल पाहण्यास मिळाला आहे.

१० जिल्ह्यांमध्ये ९२ टक्के

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशाच्या तुलनेत कमी आहे. गेल्या ३ आठवड्यात रुग्ण संख्या स्थिर आहे. पण १० जिल्ह्यांमध्ये ९२ टक्के रुग्ण आहे. त्यामुळे लेव्हल ३ मध्ये अनेक जिल्हे आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. तसेच, ज्या व्यापाऱ्यांनी लशीचे दोन डोस घेतले आहे. त्यांनी दुकाने  खुले ठेवण्याबाबत मागणी केली होती. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांमध्ये निर्णय घेणार आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितलं.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना दिल्या सूचना

‘कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र नागरिकांनी मोठ्या प्रमाणाक गर्दी करायला सुरुवात केली आहे. तज्ज्ञांनी कोरोना साथीच्या तिसर्‍या लाटेचा इशारा दिल्यानंतरही लोक खबरदारी घेत नाहीत. राज्यांनी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक पर्यटनस्थळे आणि बाजारपेठेत मोठी गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ जलै रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत महत्वाची बैठक घेतली होती. त्यानंतर ९ जुलै रोजी राज्य आपत्कालिन विभागातील अधिकाऱ्यांसोबतही बैठक घेतली होती. राज्यातील निर्बंध शिथिल करण्यासाठी या दोन बैठकांमध्ये महत्वाची चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल मागितला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!