Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaAndolanUpdate : श्रीमंत शाहू छत्रपती यांनी दाखवले पंतप्रधान मोदींकडे बोट , त्यांनी मनावर घेतले तर आरक्षण मिळू शकते…

Spread the love

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणजेच  केंद्राने हा मराठा आरक्षणाचा विषय मनावर घेतला आणि आपल्या बाजूने मांडायचं ठरवलं तरच हा प्रश्न सुटू शकतो अशी स्पष्टोक्ती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केली. दरम्यान उद्धव ठाकरे, अजित पवार  यांनी याबाबत  मोदींनी सकारात्मकता दाखवली असल्याचे  म्हटले  असले  तरी अद्यापही  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काय विचार आहेत समजलेले  नाही असेही  यावेळी त्यांनी म्हटले .


कोल्हापुरात  शाहू महाराजांच्या स्मृती स्थळाजवळ झालेल्या मराठा क्रांती मूक आंदोलनात शाहू महाराज बोलत होते.  यावेळी बोलताना श्रीमंत शाहू महाराज पुढे म्हणाले कि , केंद्राने हा विषय मनावर घेतला आणि आपल्या बाजूने मांडायचं ठरवलं तरच हा प्रश्न सुटू शकतो,  कायद्यात आतापर्यंत इतके बदल झाले असताना आणखी एक बदल करण्यास काय अडचण आहे ? अशी विचारणा करताना मनात आणलं तर सगळं होऊ शकते.

दरम्यान महाराष्ट्राने एकत्र येऊन आमदार, खासदारांनी हा विषय दिल्लीपर्यंत पोहोचवणे  गरजेचे  आहे. तो कसा न्यायचा यावर विचार केला पाहिजे. संभाजीराजेंना दिल्लीत पोहोचवण्यासाठी सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. एकट्यावरच जबाबदारी टाकणे  आणि त्याने सर्व करणे  अशक्य आहे. त्यामुळे खासदार आणि मंत्रीमंडळाने दिल्लीत विषय पोहोचवला पाहिजे. तसेच फक्त मोदींकडे विषय मांडून चालणार नाही. पंतप्रधान म्हणतील मी काय करु, बाकीच्यांचे  मत काय माहिती नाही, असे  चालणार नाही. बहुमतासाठी लॉबिंग करावे  लागेल, असेही ते म्हणाले आहेत.

राज्यात गेल्या काही वर्षात ५८ मूक मोर्चे आणि मुंबईतील भव्य मोर्चा शांततेने पार पडले. जनतेमध्ये, समाजात नाराजी असल्याचे  मी पाहत होतो. एकमुखाने विषय हाताळण्यापेक्षा एकमेकांच्या विरोधात बोलण्याचे  तसेच दुफळी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु होते. संभाजीराजेंनी रायगडावरुन गर्जना केल्यानंतर आम्ही त्यांना भूमिका थोडी बदलली पाहिजे, सौम्य पद्धतीने आणि सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले  पाहिजे असे सांगितले . महाराष्ट्राने एकमुखाने पुढे गेले  पाहिजे याच दृष्टीकोनातून हे मूक आंदोलन करण्यात आले ,” असेही ते म्हणाले.

सगळंच मिळेल अशी अपेक्षा करु नका

दरम्यान अजित पवार यांच्या  भेटीदरम्यान मांडण्यात आलेले मुद्दे रास्त असून योग्य विचार करु असे  आश्वासन दिले आहे. राज्य सरकार आपल्यासोबत असणार आहे यात मला शंका वाटत नाही असे  स्पष्ट करताना शाहू महाराजांनी  सगळेच  मिळेल अशी अपेक्षा करु नका असा सल्लाही  यावेळी बोलताना दिला.  जे शक्य आहे आणि योग्य आहे ते जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर मिळणं हा मुख्य प्रश्न आहे असं ते म्हणाले आहेत. संसदेत दोन तृतीयांश  खासदार आपल्या बाजूने वळवावे लागतील आणि  पंतप्रधान मोदी यांनी ठरवलं तर नक्कीच मराठा आरक्षण मिळू शकतं’, आग्रही प्रतिपादन त्यांनी शेवटी केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!