Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

देशाला मोठा दिलासा : सलग ११ व्या दिवशी पॉझिटिव्हिटी दर हा १० टक्क्यांच्या खाली, रुग्णांची संख्या उतरणीला…

Spread the love

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १ लाख ३२ हजारांवर नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या ८ दिवसांपासून करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. जवळपास ६८ टक्के रुग्णसंख्या कमी झाली आहे. तर देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ६६ टक्के रुग्ण हे देशातील फक्त ५ राज्यांमध्ये आहे. ३३ टक्के रुग्ण हे ३१ राज्यांत आहे. रोज १०० हून अधिक रुग्ण आढळून येणाऱ्या जिल्ह्यांची संख्याही सतत कमी होत आहे. ३७७ जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत ५ टक्क्यांहून कमी रुग्ण आढळले आहेत. २५७ जिल्ह्यांत १०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. देशातील करोनातून बरे होण्याचा दर हा वाढून आता ९३.१ टक्के इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

२२.४१ कोटी डोस देण्यात आले आहेत. यात आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर्स आणि ४५ वर्षांवरील नागरिकांचा समावेश आहे. १८ ते ४५ वर्षांदरम्यान २.४३ कोटी नागरिकांना लसीचे डोस दिले आहेत, असे त्यांनी सांगितले .

भारता लसीचा किमान एक डोस घेणाऱ्यांची संख्या ही १७.२ कोटी इतकी आहे. लसीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ही अमेरिकेपेक्षाही अधिक आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.

देशात आता अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १६, ३५, ९९३ इतकी आहे. देशात कोरोना चाचणीचा वेग वाढवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत २०, ७५, ४२८ चाचण्या करण्यात आल्या. देशातील पॉझिटिव्हिटी दर हा सतत कमी होत आहे. सलग ११ व्या दिवशी पॉझिटिव्हिटी दर हा १० टक्क्यांच्या खाली आहे. गुरुवारी पॉझिटिव्हिटी दर हा ६.३८ टक्के होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!