Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

JEE Advanced 2021 Postponed: कोरोनामुळे आईआईटी प्रवेश परीक्षा स्थगित

Spread the love

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जेईई अॅडव्हांस आईआईटी प्रवेश परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. आता ही परीक्षा कधी घेतली जाईल याबाबत आणखी कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. ही परीक्षा 3 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. तसेच यावेळी जेईई मेन परीक्षा देखील घेण्यात आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून देशभरात जेईई अॅडव्हांस 2021 परीक्षा 3 जुलै 2021 रोजी घेतली जाणार असल्याची माहिती दिली होती. दारमयांत यावर्षी विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश घेताना 75 टक्के ची पात्रता सुद्धा शिथिल करण्यात आल्याचे पोखरियाल यांनी त्यावेळी सांगितले होते.

अनेक विद्यार्थ्यांनी यावर्षी आयआयटी प्रवेशासाठी बारावी परीक्षेत 75 टक्केची पात्रता शिथिल करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे जेईई अॅडव्हांस 2021 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळाला होता. मात्र आता ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. तसेच, जेईई (मेन) 2021 सत्रातील परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. देशातील 23 आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई अॅडव्हांस 2021 परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना जेईई (मेन) 2021 परीक्षेला सामोरे जावे लागते. यावर्षी 4 सत्रामध्ये ही परीक्षा विद्यार्थ्यांना देण्यास सवलत दिली गेली होती. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल,मे 2021 या चार सत्रामध्ये जेईई मेन परीक्षा घेतल्या जाणार होत्या. मात्र या परीक्षांना यंदा स्थगित केले आहे.

त्याआधी कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. नीट पीजी किमान 4 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि परीक्षा 31 ऑगस्ट 2021 पूर्वी घेण्यात येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!